Join us

आराध्या कधी शाळेत जाते की नाही? ऐश्वर्या रायनेच दिले या प्रश्नाचे खरेखुरे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2023 16:33 IST

Aishwarya rai Bacchan Shares how aaradhya manage her school in frequent travelling : सतत आईसोबत विमानतळावर दिसणाऱ्या आराध्याच्या शाळेबाबत नेटकऱ्यांना पडला प्रश्न...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही चित्रपटसृष्टीतून काहीशी दूर गेली असली तरी तिच्या सौंदर्यावर आजही तिचे चाहते फिदा आहेत. ऐश्वर्या हल्ली बरेचदा तिची मुलगी आराध्या हिच्यासोबत विमानतळावर स्पॉट होते. या दोघी माय-लेकींमधील बाँड अतिशय स्पेशल असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते. सोशल मीडियात ऐश्वर्या सक्रीय नसली तरी विविध माध्यमातून ऐश्वर्या बराच प्रवास करत असल्याचे आपल्याला दिसते. मुलीला घेऊन इतक्यांदा परदेश वाऱ्या करते तर मुलगी शाळेत कधी जाते असा प्रश्न नेटकऱ्यांनी नुकताच उपस्थित केला. आपल्या मुलीच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केल्याने ऐश्वर्याने एका मुलाखतीत या प्रश्नाचे उत्तर दिले (Aishwarya rai Bacchan Shares how aaradhya manage her school in frequent travelling). 

त्यामध्ये ऐश्वर्या म्हणते, मी माझ्या बहुतांश ट्रिप्स या विकेंडला प्लॅन करते. त्यामुळे आराध्याची शाळा बुडण्याचा प्रश्नच नसतो. तुम्ही नीट लक्ष देऊन पाहात असाल तर आम्ही अनेकदा विकेंडला विमानतळावर दिसतो. त्यामुळे शाळा आणि ट्रिप यांचे योग्य ते नियोजन करुनच मी सगळ्या गोष्टी करते. प्लॅनिंग आणि टाइम मॅनेजमेंट चांगले असले तर फार अडचणी येत नाहीत. नुकतीच ऐश्वर्याने पॅरीस येथे फॅशन विकसाठीही हजेरी लावल्याचे दिसले होते, त्यावेळीही आराध्या तिच्या सोबत होती. मी आता उत्तम ट्रॅव्हल मॅनेजर झाली आहे त्यामुळे आठवड्याची शाळा झाली की आम्ही निघतो आणि सोमवारी शाळेच्या आधी आम्ही परत आलेले असतो. आता आराध्याची शाळाही तितकीच महत्त्वाची असल्याने त्यामध्ये हयगय होणार नाही याची एक आई म्हणून मी नीट काळजी घेते असेही ऐश्वर्या नेटीझन्सच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणते. 

(Image : Google )

आराध्याला पुढच्या महिन्यात १२ वर्ष पूर्ण होतील. ती धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. ऐश्वर्या कोणत्याही सामाजिक ठिकाणी जाताना आराध्याचा हात घट्ट पकडलेली दिसते. ती कधीच आराध्याला एकटीला सोडत नाही. यावरुनही तिच्यावर नेटीझन्स काहीवेळा टिका करताना दिसतात. मात्र ती नेटीझन्यच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष न देता आपल्या मुलीसाठी जे योग्य आहे तेच करताना दिसते. ऐश्वर्याच्या पालकत्त्वाचे स्वत: अभिषेक बच्चनही बरेचदा जाहीर कौतुक करतो. त्यामुळे आराध्याच्या शाळेबाबत कोणाला काही प्रश्न असेल तर ऐश्वर्याने त्यांना सडोतोड असे उत्तर दिलेले आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलऐश्वर्या राय बच्चनशाळा