१९६६ साली रीता फारिया ही मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला होती. रीता नंतर १९९४ साली बॉलिवूड फेम ऐश्वर्या रॉय हिने मिस वर्ल्डचा किताब जिंकून एक इतिहास रचला. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर, ऐश्वर्या रॉय हिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये हिरोईन म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली.
ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर, या स्पर्धेत घेतल्या जाणाऱ्या विशिष्ट कॉन्टेस्टबद्दल तिच्या मनातील एक अस्वस्थता व्यक्त केली आहे. मिस वर्ल्ड हे विजेतेपद मिळविण्यासाठी सौंदर्यवतींना बिकिनी आणि स्विमसूट सारखे तोकडे कपडे घालून स्टेजवर रॅम्प वॉक करावा लागतो. मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यासाठी सौंदर्यवतींना अशा प्रकारचे तोकडे व अंग प्रदर्शन करणारे बिकिनी आणि स्विमसूट घालणे ऐश्वर्याला पटले नाही(Aishwarya Rai Bachchan Once Asked Miss World Organisers To Eliminate The Bikini Round?).
ऐश्वर्याचे म्हणणे काय आहे?
एका इंटरव्ह्यू दरम्यान ऐश्वर्याने मिस वर्ल्ड या स्पर्धेबाबत तिच्या मनातील अस्वस्थता व्यक्त केली आहे. मिस वर्ल्ड या ब्युटी कॉन्टेस्टबद्दल सांगताना ऐश्वर्या म्हणाली, "मी जेव्हा १९९४ साली मिस वर्ल्डचा 'किताब जिंकले. त्यानंतर मिस वर्ल्ड या ब्युटी स्पर्धेमधून बिकिनी आणि स्विमसूट घालण्याची कॉन्टेस्ट रद्द करावी अशी विनंती, मी स्वतः आयोजकांना केली होती. ऐश्वर्याच्या शब्दाचा मान राखत मिस वर्ल्डच्या आयोजकांनी लगेचच १९९५ साली मिस वर्ल्डच्या स्पर्धेतून बिकिनी आणि स्विमसूट घालण्याची कॉन्टेस्ट रद्द केली. सौंदर्यवतींनी बिकिनी व स्विमसूट सारखे तोकडे कपडे घालून स्टेजवर रॅम्प वॉक करणे हे आपल्या राष्ट्रीयत्वाला शोभा देणारे नाही. याबद्दल अधिक माहिती देताना ऐश्वर्या सांगते की, हे मत मी फक्त माझ्यासाठीच नाही मांडले तर, विविध देशांतून ही ब्युटी कॉन्टेस्ट जिंकण्याच्या उद्देशाने येणाऱ्या सगळ्या सौंदर्यवतींच्यावतीने मी हे मत मांडले आहे, असा खुलासा ऐश्वर्या रॉय हिने केला आहे. सामाजिक प्रदर्शनाच्या दृष्टीने सौंदर्यवतींना बिकिनी व स्विमसूट सारखे तोकडे कपडे घालायला लावणे हा योग्य पर्याय नाही असे ऐश्वर्याचे मत आहे. अखेरीस, मिस वर्ल्डच्या आयोजकांनी स्विमसूट कॉन्टेस्ट स्पर्धेतून काढून टाकली. केवळ शारीरिक सौंदर्याऐवजी 'बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व' यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी स्विमसूट कॉन्टेस्ट स्पर्धेतून काढून टाकली.
मिस वर्ल्ड कॉन्टेस्टच्या अध्यक्षा यांचे याविषयीचे मत...
मिस वर्ल्ड कॉन्टेस्टच्या अध्यक्षा जूलिया मोर्ले यांनी स्पर्धेत आता यापुढे स्वीमसूट राउंड होणार नाही अशी घोषणा करत गेल्या ६३ वर्षांची परंपरा मोडीत आल्याचे घोषित केले होते. याविषयी आपले मत मांडताना त्या म्हणतात की, सौंदर्यवतींना बिकिनीमध्ये फिरताना पाहण्याची मला गरज वाटत नाही. याचा महिलांशी काहीही संबंध नाही, असे त्यांना वाटते. कोण कसं दिसत, कोण कोणापेक्षा दिसायला सुंदर आहे याच्याशी माझा काहीच संबंध नाही. बुद्धिमत्ता कॉन्टेस्ट मध्ये त्या नेमक्या काय उत्तर देतात किंवा काय बोलतात यांच्यावर आमचे सगळे लक्ष असते. त्या काय बोलतात यातून प्रत्येकीचे वास्तविक व्यक्तिमत्व प्रकट होते. जे तिला वास्तवात खरी सौंदर्यवती बनण्यास मदत करते.