Lokmat Sakhi >Social Viral > ''आखिर पत्थर दिल मिल ही गया'' नक्की भानगड काय, पहा व्हायरल फोटो..

''आखिर पत्थर दिल मिल ही गया'' नक्की भानगड काय, पहा व्हायरल फोटो..

Social Viral सोशल मिडीयावर ''पत्थर दिल'' तुफान व्हायरल, त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 06:34 PM2022-12-07T18:34:27+5:302022-12-07T18:35:24+5:30

Social Viral सोशल मिडीयावर ''पत्थर दिल'' तुफान व्हायरल, त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

"Akhir patthar dil mil hi gaya" What is the matter, see the viral photo.. | ''आखिर पत्थर दिल मिल ही गया'' नक्की भानगड काय, पहा व्हायरल फोटो..

''आखिर पत्थर दिल मिल ही गया'' नक्की भानगड काय, पहा व्हायरल फोटो..

पत्थर के सनम, पत्थर के फुल, पत्थर दिल असे अनेक चित्रपटात हृदयाची तुलना एका दगडाशी करण्यात आली आहे. बररं, ते पण का ? जर एखादी आवडणारी व्यक्ती आपला स्वीकार करत नसेल अथवा ती व्यक्ती कठोर हृदयाची झालेली असेल. तर आपण त्या व्यक्तीला ''पत्थर दिल'' असे म्हणतो. आतापर्यंत या कठोर हृदयावर अनेक चित्रपट, गाणी, शायरी लिहिण्यात आली आहे. तरी देखील ज्यांचे ''पत्थर दिल'' आहेत त्यांचे हृदय कोमल कधी होतील याचीच वाट प्रेमवीर पाहत आहेत. दरम्यान, सोशल मिडीयावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दगडाला हृदयाचा आकार आला आहे. या फोटोवर नेटकरी ''आखिर पत्थर दिल मिल हि गया'' असे कमेंट करत आहेत.

 

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आपण बघू शकता की, दगडांच्या घोळक्यात एक हृदय आकाराचा दगड दिसून येत आहे. दरम्यान, या दगडाला हृदयाचा आकार आलाच कसा ? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. सध्या या दगडाची जोरदार चर्चा इंटरनेटवर होत आहे. हा फोटो ''जिंदगी गुलजार है'' या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या फोटोवर नेटकरी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करीत असून, तुफान व्हायरल होत आहे. 

Web Title: "Akhir patthar dil mil hi gaya" What is the matter, see the viral photo..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.