उद्योजक नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती यांची लेक म्हणजे अक्षता मुर्ती. ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्या त्या पत्नी आहेत. एरवी कधीच त्या खूप चर्चेत नसतात. पण सध्या मात्र त्यांची खूपच चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. आणि एवढी चर्चा होण्यामागचं कारण आहे त्यांनी नेसलेली रॉयल ब्लू रंगाची साडी. या साडीची एवढी चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांनी ती साडी यापुर्वीही नेसली होती. उद्योजक दाम्पत्याची लेक, पंतप्रधानांची पत्नी असूनही त्यांनी जुनीच साडी पुन्हा नेसली म्हणून सध्या त्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. (Akshata Murty champions sustainability by re-wearing silk saree in neasden temple london)
अक्षता यांचे दिवाळीचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये त्या त्यांच्या मुली आणि नवऱ्यासोबत दिवाळी साजरी करताना दिसल्या. त्यावेळी त्यांच्या अंगावर जी रॉयल ब्लू रंगाची साडी होती, तिच साडी त्यांनी लंडन येथील स्वामी नारायण मंदिरात नेसली होती.
काळपट, कोरडे ओठ होतील गुलाबी आणि लोण्यासारखे मऊ, बघा १ खास उपाय- लिपस्टिकची गरजच नाही
ऋषी सुनक आणि अक्षता या दोघांनीही त्या मंदिरात जाऊन काही धार्मिक विधी पार पाडले आणि नंतर मंदिरात जमलेल्या जनसमुदायाची संवाद साधला. यावेळी एवढं मोठं व्यक्तिमत्त्व असूनही अक्षता यांनी sustainability चा प्रचार आणि प्रसार करत जुनीच साडी पुन्हा नेसली, यामुळे त्यांच्या साधेपणाचं कौतूक होत आहे.
सेलिब्रिटी मंडळी साधारण एकाच कपड्यात पुन्हा दिसत नाहीत. पण आलिया भटने मात्र तो ट्रेण्ड पुन्हा आणला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आलियाने आवर्जून तिच्या लग्नातलीच साडी नेसली होती.
साध्या जेवणालाही चटकदार चव आणणारी आणि वर्षभर टिकणारी दही मिरची, रेसिपी बघा- लगेच करा
यानंतर सारा अली खान, रत्ना पाठक आणि इतर काही सेलिब्रिटींनीही त्यांचे आधीचे कपडेच पुन्हा नव्या स्टाईलने नेसले होते. आता पुन्हा एकदा अक्षता यांच्या निमित्ताने तिच चर्चा रंगली आहे. अक्षता यांनी नेसलेली साडी प्लेन असून तिला बारीकसे सोनेरी काठ आहेत. यावर त्यांनी थ्री फोर्थ बाह्या असणारं बोटनेक ब्लाऊज घातलं होतं. मोजकेच दागिने आणि हलका मेकअप यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळीच छान पडत होती.