ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल नुकताच लागला आणि त्यामध्ये हुजुर पक्षाचा पराभव झाला. यामुळे भारतीय वंशाचे ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी १० डाऊनिंग स्ट्रीटबाहेर निरोपाचे भाषण केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अक्षता मुर्ती यांची उपस्थिती होती. अक्षता मुर्ती म्हणजे प्रसिद्ध उद्योजक नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती यांच्या कन्या. खरंतर त्याप्रसंगी सुनक यांच्या भाषणाची चर्चा होणे अपेक्षित होते. पण झाले उलटेच. सुनक यांच्या निरोपाच्या भाषणापेक्षाही सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते अक्षता मुर्ती यांच्या ड्रेसने. आणि त्याचीच चर्चा सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल आहे. (Akshata Murty wore Indian label dress that cost ₹42,000 at Rishi Sunak's resignation speech)
सुनक यांच्या भाषणाप्रसंगी अक्षता यांनी एक कॉटनचा वनपीस घातला होता. त्यांच्या त्या ड्रेसवर निळ्या, पांढऱ्या आणि लाल रंगाचे पट्टे होते.
तुम्ही ज्याला 'सुपरफूड' म्हणता तेच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं! वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला
ब्रिटिश न्यूज आउटलेट टेलिग्राफ यांनी दिलेल्या वृत्तानुसार अक्षता यांनी घातलेला तो ड्रेस भारतीय फॅशन ब्रॅण्डचा असून त्याची किंमत ४२ हजार रुपये एवढी आहे. खरंतर त्यामुळे त्या ट्रोल होण्याचं किंवा त्या ड्रेसची एवढी चर्चा होण्याचं काहीच कारण नाही. पण काही जणांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या ऐपतीपेक्षा खूपच कमी किमतीचा ड्रेस निवडला आहे.
तर काही जणांच्या मते तो ड्रेस इंग्लंड आणि अमेरिकेच्या राष्ट्रध्वजात असणाऱ्या रंगांचा असून तो एखाद्या ध्वजाप्रमाणेच दिसतो म्हणून त्यांना ट्रोल केलं जात आहे.
संशोधक सांगतात 'या' कारणामुळेच खूप अभ्यास करूनही मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत...
तर या चर्चेत सहभागी झालेले काही लोक अशाही मताचे आहेत की अक्षता यांनी घातलेल्या ड्रेसच्या किमतीपेक्षा, रंगापेक्षा तो ड्रेस भारतीय ब्रॅण्डच्या फॅशन हाऊसचा आहे, ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. वास्तविक पाहता अक्षता मुर्ती त्या ड्रेसमुळे सध्या ट्रोल होत असल्या तरीही मागील वर्षी ब्रिटनच्या टॅटलर मासिकाच्या सर्वोत्कृष्ट पोशाखाच्या यादीत त्यांनी अव्वल स्थान पटकावले होते. यावरूनच त्यांचा फॅशन सेन्स कसा आहे, हे लक्षात येतं.