Join us  

आलिया भटला कोणता पदार्थ खाण्याचे डोहाळे लागलेत? नेटिझन्सने सुचवले भन्नाट पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 12:08 PM

Alia Bhat Cravings in Pregnancy Viral post on Social Media : आलियालाही आता डोहाळे लागायला सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देतिचा प्रेग्नन्सीमधील लूक आणि फॅशनवरुनही चाहते तिच्या प्रेमात असल्याचे पाहायला मिळते. लवकरच आलियाचे डोहाळजेवणही होणार असून तिची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर डोहाळजेवणाच्या तयारीला लागल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट गर्भवती असल्याचे समजले आणि बॉलिवूडमध्ये तिच्याबाबतच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. ती आधीच गर्भवती होती का, गर्भवती असतानाही इतकं काम कसं करते, हाय हिल्स घालते, तिचा फॅशन सेन्स, ब्रम्हास्त्र चित्रपटाचे प्रमोशन अशा एक ना अनेक बाबतीत आलिया चर्चेत आहे. लवकरच आई होणारी आलिया आता गर्भधारणेच्या शेवटच्या ट्रायमिस्टरमध्ये आहे. नुकत्याच तिने केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोशल मीडियामुळे सध्या सगळ्या गोष्टी जाहीर होणे अतिशय सोपे झाले असल्याने आलियाचे अपडेटही अगदी सहज मिळतात. आपल्याला ज्याप्रमाणे गर्भधारणा असताना काही ना काही खावेसे वाटते त्याचप्रमाणे आलियालाही आता डोहाळे लागायला सुरूवात झाली आहे (Alia Bhat Cravings in Pregnancy Viral post on Social Media).

आलियाने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एक स्टेटस अपडेट केले आहे. ज्यामध्ये ती तिच्या फॉलोअर्सना विचारते मुंबईमध्ये पिझ्झा कुठे चांगला मिळेल? याचाच अर्थ सध्या तिला पिझ्झा खाण्याचे डोहाळे लागले असल्याचे समजते. याआधीही आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन Tiramisu या मूळच्या इटलीमधील डेझर्टचा फोटो अपलोड केला होता. त्यामुळे आलियालाही तिच्या आवडीच्या पदार्थांचे डोहाळे लागायला सुरुवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. लवकरच आलियाचे डोहाळजेवणही होणार असून तिची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर डोहाळजेवणाच्या तयारीला लागल्याचे सांगण्यात येत आहे. हे डोहाळजेवण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबाबतची माहिती कळेल असे मीडिया रिपोर्टसमध्ये सांगण्यात आले आहे. 

आलिया आणि रणबीर कपूर या रिअल लाईफमधील जोडीने ब्रम्हास्त्र या चित्रपटात पडद्यावर आपली केमिस्ट्री दाखवून दिली आहे. त्यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलाच गल्ला मिळवला आहे. हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्येही आलियाने पदार्पण केलं आहे. इतकंच नाही तर बाळाच्या जन्मानंतरही आलिया एस.एस. राजमौलींच्या सिनेमात प्रसिद्ध साऊथ अभिनेता महेश बाबूसोबत झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिया सध्या सोशल मीडियावर चागंलीच अॅक्टीव्ह असून आपले वेगवेगळ्या अंदाजातील फोटो अपलोड करताना दिसते. तिचा प्रेग्नन्सीमधील लूक आणि फॅशनवरुनही चाहते तिच्या प्रेमात असल्याचे पाहायला मिळते.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाआलिया भटप्रेग्नंसी