अभिनेत्री आलिया भट आणि तिचं साडी प्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी, कार्यक्रमांसाठी ती आवर्जून साडीच नेसते. नुकत्याच झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही आलियाने साडी नेसण्यास प्राधान्य दिले होते आणि अतिशय देखणा लूक केला होता. तिचा तो लूक जगभरच कमालीचा व्हायरल झाला. एवढंच नाही तर अशा जागतिक दर्जाच्या सोहळ्यासाठी तिने भारतीय संस्कृतीचं प्रतिक असणाऱ्या साडीची निवड केली, यामुळे तिचं तिच्या चाहत्यांनी कौतूकही केलं. आलियाचं हे साडीप्रेम काही काल- परवाचं नाही. तिला लहानपणापासूनच साडी नेसायला आवडते. बघा तिने सांगितलेल्या साडीप्रेमाचा एक खास किस्सा...(alia bhat sharing her experience of first time wearing saree)
आलिया भटने तिच्याविषयी स्वत:चा सांगितलेला एक किस्सा सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये आलिया सांगते की ती इयत्ता ९ वीमध्ये असताना पहिल्यांदा साडी नेसली होती.
वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस, कोणता व्यायाम करावा? बघा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला
आयुष्यात पहिल्यांदा साडी नेसल्यानंतर साडीच्या निऱ्या सांभाळत चालणे, पदर आणि निऱ्या या दोन्ही गोष्टी सावरून धरणे हे बहुतांश जणींना खूपच अवघड जातं. तसंच काहीसं आलियाचंही झालं. त्यातूनच एक मजेशीर किस्सा घडला आणि तोच तिने सांगितला आहे. आलिया म्हणते की शाळेत एकदा शिक्षक दिनाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी तिने पहिल्यांदा साडी नेसली होती.
साडी नेसून ती कशीबशी साडी सावरत शाळेत पाेहोचली. पण शाळेत पोहोचून ती जशी चालायला लागली तशा तिच्या साडीच्या निऱ्या सुटून गेल्या.
अक्षयकुमारला खूप आवडतो 'हा' सुपरहेल्दी पदार्थ, मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम, बघा रेसिपी
त्यामुळे मग ऐनवेळी झालेली ही फजिती आवरता आवरता तिच्या नाकी नऊ आले.. साडी नेसल्यावर बहुतांश जणींना हा अनुभव येतोच..आलियाची ही फजिती ऐकून बऱ्याच मैत्रिणींना त्यांचा पहिल्यांदा साडी नेसण्याचा दिवस आणि साडी सावरता सावरता होणारी कसरत आठवली असेल..
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1597852417454116/}}}}