Lokmat Sakhi >Social Viral > आलिया भट म्हणते प्रत्येकवेळी बेस्ट असण्याची अपेक्षा कायम बायकांकडून का? उणीवा असल्याच तर..

आलिया भट म्हणते प्रत्येकवेळी बेस्ट असण्याची अपेक्षा कायम बायकांकडून का? उणीवा असल्याच तर..

Strength and weakness of Alia Bhatt: माझ्यामध्ये अनेक कमतरता आहेत, हे मला मान्य आहे. पण हो... माझ्यात नक्कीच काही चांगल्या गोष्टीही आहेत. म्हणूनच मी माझ्या स्ट्रेन्थसोबतच माझे विकनेसही स्विकारते आणि ते सेलिब्रेट करते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 02:19 PM2022-10-06T14:19:34+5:302022-10-06T14:20:19+5:30

Strength and weakness of Alia Bhatt: माझ्यामध्ये अनेक कमतरता आहेत, हे मला मान्य आहे. पण हो... माझ्यात नक्कीच काही चांगल्या गोष्टीही आहेत. म्हणूनच मी माझ्या स्ट्रेन्थसोबतच माझे विकनेसही स्विकारते आणि ते सेलिब्रेट करते.

Alia Bhatt asks why there are so many rules only for women, She said accept your strength and weaknesses as well | आलिया भट म्हणते प्रत्येकवेळी बेस्ट असण्याची अपेक्षा कायम बायकांकडून का? उणीवा असल्याच तर..

आलिया भट म्हणते प्रत्येकवेळी बेस्ट असण्याची अपेक्षा कायम बायकांकडून का? उणीवा असल्याच तर..

Highlightsतुम्ही जसे आहात तसे स्विकारा, तुमच्यातला कमीपणा स्विकारा आणि मोकळेपणाने सांगा. तरच तुम्ही 'तुम्ही' म्हणून जगू शकाल.

आलिया भट (Alia Bhatt) म्हणजे आजच्या तरुणाईची आयकॉन. तिला फॉलो करणारे किंवा तिला मानणारे अनेक जण आहेत. कधी तिच्या जनरल नॉलेजची, तिच्या बिनधास्त बोलण्याची खिल्ली उडवली जाते, तर कधी तिच्या अभिनयाची भरभरून स्तुतीही केली जाते. अशी ही आलिया कधी टिकेची धनी होते, तर कधी कौतूकाची मानकरी. तिच्यातल्या याच पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह (Strength and weakness of Alia Bhatt) गोष्टी तिने स्विकारल्या आणि त्या सगळ्यांसमोर मान्यही केल्या. आपल्यातला कमीपणा असा चारचौघांत सांगायलाही हिंमत लागते आणि ती आलियाने दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यात आलिया स्वत:विषयी भरभरून बोलली आहे. 

 

पुरस्कार सोहळ्यात आलिया म्हणाली की.....
आलियाला नुकताच एका वाहिनीतर्फे पुरस्कार देण्यात आला. यात बोलताना ती म्हणाली की माझ्यात निश्चितच अनेक उणीवा आहेत. जसं की मी स्पेलिंग लिहिताना खूप चुका करते. पण एखाद्या दुबळ्या व्यक्तीशी कसं बोलायचं हे मला ठाऊक आहे. माझं जनरल नॉलेज कच्चं आहे. पण माझा इमोशनल कोशंट मात्र चांगला आहे. मला दिशा फार समजत नाहीत. पण लोकांच्या भावना ओळखून मात्र मी त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकते. 

 

याला जोडूनच आलियाने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यात ती म्हणते की सगळे नियम विशेषकरून महिलांसाठीच असतात. जसं की खूप हिंमत दाखवू नको- पण भित्री भागुबाईही बनू नको, खूप जाड होऊ नको- पण खूप बारीकही राहू नको, महत्वकांक्षी हो- पण खूपही नाही.

स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरा, १५ दिवसात केस गळण्याचं प्रमाण होईल कमी; सुधारेल केसांचा पोत

स्वत:वर विश्वास ठेव- पण अहंकारी होऊ नको. हे सगळे नियम पाळता- पाळता आपण कुणाला तरी आवडावं, कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं, म्हणून बेस्ट होण्याचा प्रयत्न करतो. आपण दोषरहीत असावं, अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण ती अशक्य गोष्ट आहे. अशी व्यक्ती केवळ गोष्टीच्या पुस्तकातच असू शकते.

दुर्गापूजेला राणी मुखर्जीने नेसली सुंदर गुलाबी सिल्क साडी, बघा तिच्या जरतारी साडीचा थाट

मागच्या १० वर्षांत मी जे काही अनुभवलं आहे, त्यातून एवढंच सांगेल की नेहमीच बेस्ट करण्याचा प्रयत्न कराल, तर स्वत:ला हरवून बसाल. तुम्ही जसे आहात तसे स्विकारा, तुमच्यातला कमीपणा स्विकारा आणि मोकळेपणाने सांगा. तरच तुम्ही 'तुम्ही' म्हणून जगू शकाल.

 

  

Web Title: Alia Bhatt asks why there are so many rules only for women, She said accept your strength and weaknesses as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.