Join us  

शॉर्ट ड्रेसमध्ये आलिया भट दिसते 'फायर', पण नेटकऱ्यांना हा ड्रेस खटकला, ट्रोल केले कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2023 3:49 PM

Alia Bhatt brutally trolled for her ‘tacky, weird’ outfit, netizens say ‘looks like wrestler’s outfit’ : नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलिया, 'तुझा हा ड्रेस पैलवानाच्या पोशाखासारखा दिसतो.' पाहा युजर्सना हा ड्रेस का नाही आवडला?

क्युट गर्ल आलिया भट्टचा (Alia Bhatt) फायर लूक सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. तिने नुकतंच सोशल मिडीयावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने मरुन रंगाचा डीप नेक मिनी ड्रेस परिधान केलेला आहे. या ड्रेसमध्ये आलिया तिची कर्व्ही बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मात्र, तितकंच ट्रोल देखील केलं आहे.

सध्या या ड्रेसची सोशल मीडियात प्रचंड चर्चा होत असून, आलिया या ड्रेसवर पोझ देताना थोडी अनकम्फर्टेबल दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं (Trolled by Users) म्हणणं आहे. ती व्हायरल व्हिडिओमध्ये वारंवार ड्रेस अॅडजस्ट करताना दिसली. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला परिधान केलेल्या रोम्पर ड्रेसवरून कमेंट करत ट्रोल केलं आहे(Alia Bhatt brutally trolled for her ‘tacky, weird’ outfit, netizens say ‘looks like wrestler’s outfit’).

रोम्पर ड्रेसवरून आलिया झाली ट्रोल

बी टाऊनची आघाडीची अभिनेत्री आलिया अनेक कारणांमुळे चर्चेत असते. आलियाने नुकतंच जिक्यू मॅगझिनच्या मॅन ऑफ द इयर अवॉर्ड्स शोमध्ये हजेरी लावली होती.  यात तिने मरून रंगाचा रोम्पर ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा रंग तिच्यावर खुलून तर दिसत होताच, शिवाय या ड्रेसवर ती मनमोहक दिसत होती. आलीयाने परिधान केलेला हा ड्रेस लक्झरी इटालियन फॅशन हाऊस गुच्चीचा होता. या जंपसूटस्टाईल आउटफिटची नेकलाइन डीप होती.

ऑस्ट्रेलियाने जिंकला वर्ल्ड कप आणि चर्चा एका भारतीय तरुणीची! कोण ती, मिचेलबरोबरचे फोटो व्हायरल

आलियाने ड्रेससोबत प्लॅटफॉर्म हील्स घातले होते. हे शूज अगदी फॅशनेबल दिसत होते. या ड्रेसवर आलियाने केस मोकळे सोडले होते. तसेच कानात सोनेरी रंगाच्या इयररिंग्स घातल्या होत्या. मात्र, एवढं सर्व असूनही ती या ड्रेसवर अनकम्फर्टेबल दिसत होती. ती सारखी ड्रेस अॅडजस्ट करताना दिसली. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला सिंपल आउटफिट परिधान करण्यास सल्ला दिला.

नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलिया

गॅरेजमध्ये केली बालाजी टेलीफिल्मची स्थापना, मुलांना सांभाळल्याबद्दल वडील-भावाचे मानले आभार, एकताचं निर्माती होणं सोपं नव्हतं

एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'मला वाटतं हा ड्रेस एखाद्या उंच व्यक्तीचा होता, त्याला नंतर शॉर्ट करण्यात आला असावा'. तर आणखी एका युजरने 'आलिया या ड्रेसमध्ये खूप अनकम्फर्टेबल दिसत आहे. ड्रेसचा मागील भाग हा खूप तोकडा वाटत आहे.' तर दुसऱ्याने 'आलिया बहुतेक ड्रेसची चैन लावायला विसरली वाटतं.' तर एकाने, 'आलियाने लवकरात लवकर तिच्या स्टायलिस्टला काढून टाकायला हवे.' यासह एका नेटकऱ्याने 'आलियाचा हा पोशाख एखाद्या पैलावानाच्या पोशाखासारखा दिसत आहे.' 

टॅग्स :आलिया भटसोशल व्हायरलट्रोलसोशल मीडिया