बॉलिवूडची देखणी, खट्याळ, चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट हीने नुकताच आपला ३०वा वाढदिवस साजरा केला. आलियाचा जन्म दिग्दर्शक महेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या कुटुंबात झाला. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आलियाच्या कुटुंबाला अभिनयाचा आणि चित्रपटांचा वारसा असल्यामुळे तिला लहानपणापासूनच अभिनयाची गोडी लागली होती. लहानपणापासूनच शिक्षणापेक्षा तिला अभिनयक्षेत्रात अधिक रस होता. आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. चित्रपटांतील बोल्ड, हटके भूमिका, सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री, अगदी कमी कालावधीत भरपूर वजन कमी करणे अशा अनेक कारणांमुळे आलिया सतत चर्चेत होती. सध्या पण ती अशाच एका खास गोष्टीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. आलियाने तिच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसादिवशी परिधान केलेल्या स्वेटटीशर्ट वरुन ती सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे(Alia Bhatt Dons Pink Balenciaga Sweater For Her 30th Birthday Celebration).
गुलाबी रंगाच्या स्वेटटीशर्टची नक्की काय आहे खास बात...
आलियाने यावर्षी लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस नवरा रणबीर कपूरसोबत लंडनमध्ये साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहते, बॉलिवूड कलाकारांनी आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच तिने आता वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आई, बहीण, पती रणबीर कपूर दिसत आहे. त्यांनी लंडनमधील एका फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद लुटल्याचे फोटोजमध्ये दिसत आहे. आलियाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती कँडल्स लावलेल्या केकसमोर बसून इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. या फोटोमध्ये आलिया गुलाबी रंगांच्या विणलेल्या स्वेटटीशर्ट मध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोपेक्षा, या फोटोत तिने परिधान केलेल्या स्वेटटीशर्टचीच सध्या जास्त चर्चा होत आहे. आलियाने जो स्वेटटीशर्ट परिधान केला आहे त्याची किंमत थोडी थोडकी नसून चक्क १.४४ लाख इतकी असल्याचे बोलले जात आहे.
आलियाने परिधान केलेले गुलाबी रंगाचे हे स्वेटटीशर्ट Balenciaga या लक्झरी फॅशन ब्रँडचे असून ते गुलाबी व पांढऱ्या रंगाचे होते. तिच्या या गुलाबी स्वेटटीशर्ट वर Balenciaga ब्रँडचा ऑल ओव्हर लोगो प्रिंट केलेला होता. हे गुलाबी रंगाचे स्वेटटीशर्ट फुल स्लीव्हज, गोल नेकलाइन, ड्रॉप शोल्डर आणि रिबड ट्रिम्स प्रकारांतील होते. आलियाने सिल्व्हर हूप इअररिंग्स, मॅचिंग ब्रेसलेट आणि हातात पांढऱ्या रंगाची स्लिंग बॅग घेऊन आपल्या बर्थडे लूकमध्ये खूपच रॉकिंग दिसत होती. तिने हेअरस्टाईल करताना सर्व केस मागच्या बाजूला एकत्रित करुन एक साधा पोनीटेल बांधला होता. आलियाने या बर्थडे लूकला परफेक्ट मॅचिंग असा हलकासा मेकअप केला होता.