Join us  

Alia bhatt No Make Up Bridal Look : आलियाने मोडला लग्नात भरमसाठ मेकअप करण्याचा ट्रेंड, फोटो पाहून नेटिझन्स पडले प्रेमात.....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 6:32 PM

Alia bhatt No Make Up Bridal Look : लग्नाचे नेहमीचे रंग सोडून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी पांढऱ्या आणि हस्तिदंत रंगाचे क्लासिक कॉम्बिनेशन निवडले. (Alia Bhatt and Ranbir Kapoor chose a classic combination of white and ivory)

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला.  लग्नसोहळ्यातील प्रत्येक गोष्टीची चर्चा रंगली. यामध्ये आलियाच्या आगळ्यावेगळ्या मंगळसूत्राची, आऊटफिट्सचीही विशेष चर्चा झाली.  गुलाबी की लाल? नववधूचा लेहेंगा कसा दिसेल याचा अंदाज लावताना प्रत्येक आलियाच्या (Alia Bhatt) चाहत्याला हा महत्त्वाचा प्रश्न पडला होता. लग्नाचे नेहमीचे रंग सोडून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी पांढऱ्या आणि हस्तिदंत रंगाचे क्लासिक कॉम्बिनेशन निवडले. (Alia Bhatt and Ranbir Kapoor chose a classic combination of white and ivory)

आलिया रणबीरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून आलियाचा लग्नातला नो मेकअप लूक पाहून चाहते  कौतुकाचा वर्षाव करत आहेत. लग्नात भरमसाठ मेकअप केलेल्या नववधून तुम्ही नेहमीच पाहत असाल. पण आलियानं या पारंपारीक लूक्सना कलाटणी देत लग्नात आपल्या सिंपल वेडींग लूक ठेवला.  

चाहत्यांना आलियाच्या फोटोंबद्दल आश्चर्य वाटत असून तिने इतका कमी मेकअप करण्याचा निर्णय कसा घेतला हे त्यांना समजू शकत नाही. आलिया भट्टचा कमीत कमी मेकअप, जोडप्याच्या गळ्यातील ताज्या चमेलीच्या हार, लेहेंग्याची निवड 'परफेक्ट' होती. स्थळ असो, तिच्या लेहेंग्याचा रंग असो, किंवा तिच्या ओठांचा रंग असो; सर्व काही मनमोहक, अभिजात होते.

ट्विटरवर आलियाचे चाहते तिच्या खास वेडींग लूकची भरभरून स्तृती करत आहेत.  नवरीचा मेकअप म्हटला की नखांना लाल,मरुन अशा भडक रंगाची नेलपाॅलिश हे ठरलेलंच असतं  पण आलियानं स्वत:च्या बाबतीत या गृहितकाला चुकीचं ठरवून फ्रेंच मॅनिक्युअरला पसंती दिली. या फ्रेंच मॅनिक्युअरमुळेच आलियाच्याच्या नखांनी विशेष लक्ष वेधून घेतलं. याशिवाय आलियाच्या गळ्यातील नाजूक मंगळसुत्राबाबतही बरीच चर्चा झाली. 

टॅग्स :सोशल व्हायरलआलिया भटरणबीर कपूर