आपल्या मुलांचा पहिला - वहिला वाढदिवस सगळ्याच आई - वडिलांना अगदी जल्लोषात साजरा करावासा वाटतो. प्रत्येक आईवडील आपल्या मुला - मुलीचा पहिला वाढदिवस लक्षात राहील असाच साजरा करतात. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) लेक राहा (Raha) आता एक वर्षांची झाली आहे. सध्या राहाच्या पहिल्या - वहिल्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा होताना दिसतआहे. राहाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलियाने लेकीच्या पहिला वाढदिवसाच्या सेलिब्रिशनमधील काही खास क्षणाचे फोटो सोशल मिडीयावर नुकतेच शेअर केले आहेत(Alia Bhatt shares picture of daughter Raha smashing cake, Ranbir Kapoor holding her hands on first birthday).
राहाच्या वाढदिवसानिमित्त आलियाची खास पोस्ट चर्चेत...
आलिया व रणबीर हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. गेल्यावर्षी ६ नोव्हेंबरमध्ये दोघं आई-बाबा झाले. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला, जिचं नाव राहा असं आहे. आज राहाला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. तरीही अजूनपर्यंत आलिया व रणबीरने राहाचा चेहरा उघड केलेला नाही. त्यामुळे चाहत्यांना राहाची पहिली झलक तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होईल, अशी अपेक्षा होती. पण आजही आलियाने लेकीचा चेहरा न उघड करता तिचे फोटो शेअर केले आहेत(Alia Bhatt posts picture of daughter Raha Kapoor messing with cake: ‘Happy birthday baby tiger’).
लेकीला मोकळ्या हवेत फिरायलाही नेता येत नाही कारण.. आलिया भट सांगते, आईची हौस आणि..
आलिया भट म्हणाली, मी ही त्यावेळी फार घाबरले होते, नर्व्हस झाले कारण...
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये राहाचा फक्त हात दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये राहा केकबरोबर खेळताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राहा, रणबीर आणि आलियाने हातात फुल घेतलेलं पाहायला मिळत आहे. तसेच तिसऱ्या पोस्टमध्ये आलिया आणि रणबीर या दोघांनी मिळून एक ज्यूकबॉक्स हातात धरलेला दिसत आहे. या ज्यूकबॉक्सवर ‘ला वी एन रोज’ या फ्रेंच गाण्याचं म्युझिक वाजताना ऐकू येत आहे.
कॅप्शनमध्ये आलिया सांगते काही खास...
आलियाने ही पोस्ट शेअर करत लिहीलं आहे, “आमचा आनंद…आमचं आयुष्य…आमचा प्रकाश…कालच आम्ही हे गाणं तुझ्यासाठी वाजवत होतो, जेव्हा तू माझ्या पोटात लाथा मारत होतीस…मी अजून काही सांगू शकत नाही, पण एवढं म्हणते की, आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो कारण तू आमच्या आयुष्यात आहेस. तू आमचा प्रत्येक दिवस एखाद्या क्रिमी, चविष्ट, सुंदर केकच्या तुकड्याप्रमाणे बनवतेस…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छोटी वाघीण…आम्ही तुझ्यावर प्रेमापेक्षा ही जास्त प्रेम करतो…”