'लिपस्टिक' हा महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. मग प्रत्येकीला तिची तिची अशी आवडती शेडच हवी असते. अमुक एक शेड माझ्या ओठांवर सुंदर दिसत नाही, किंवा मला हिच शेड सूट करते. मेकअप हा महिलांचा आवडता प्रांत आहे. घराबाहेर पडताना किंवा सोशल मीडियावर वावरताना मेकअप करायलाच हवा असा जणू अलिखीत नियमच आहे. जर संपूर्ण मेकअप करायला वेळ नसला तरी किमान लिपस्टिक तरी आपण लावतोच, त्यामुळे लिपस्टिक हे महिलांचे सर्वात आवडते कॉस्मेटिक असते. लिपस्टिक लावल्याने मेकअप लुकसोबतच चेहऱ्याचे सौंदर्य वाढते, महिलांना लिपस्टिक लावणे अगदी मनापासून आवडते.
प्रत्येकीचे बेसिक लिपस्टिक शेड्स व ती ओठांवर लावण्याची पद्धत ही ठरलेली असते. काहीवेळा आपण एखाद्या सिलेब्रिटीची मेकअप करण्याची ट्रिक आपल्या वापरात आणून ती फॉलो करतो. सध्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिचा लिपस्टिक लावतानाचा एक व्हिडीओ भलताच चर्चेत आलेला दिसत आहे. नुकताच आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून, तिची लिपस्टिक लावण्याची एक भन्नाट ट्रिक व्हायरल केली आहे. आलिया भटची लिपस्टिक लावण्याची नेमकी कोणती ट्रिक व्हायरल झाली आहे ते पाहूयात(Alia Bhatt shares weird way of applying lipstick, how Ranbir Kapoor asks to 'wipe it off' as he likes her natural colour).
आलियाची लिपस्टिक लावण्याची अनोखी व्हायरल ट्रिक...
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात आलिया भटचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर करण्यापासून झाली आहे. आलियाने मेकअप हॅकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लिपस्टिक कशी लावायची हे सांगत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने सांगितले की ती बहुतेकवेळा न्यूड शेडची लिपस्टिक लावणे पसंत करते. त्यानंतर तिने व व्हिडीओमध्ये लिपस्टिक लावली आणि लगेच पुसून टाकली. साधारणपणे महिला लिपस्टिक लावतांना लिपस्टिक उघडून ती आपल्या ओठांवर अलगद फिरवून लावतात. शक्यतो सगळ्या महिला अशाच प्रकारे लिपस्टिक लावणे पसंत करतात. परंतु आलियाने या व्हिडीओमध्ये लिपस्टिक लावताना लिपस्टिक ओठांजवळ नेऊन, ओठांवर लिपस्टिक फिरवण्याऐवजी आपले ओठ लिपस्टिकवर फिरवले आहेत. आलिया भट पुढे म्हणाली की, मी आधी लिपस्टिक लावते आणि नंतर पुसते, कारण माझा पती रणबीर सिंग याला मी लिपस्टिक लावलेली अजिबात आवडत नाही. रणबीर तिला कायम लिपस्टिक पुसायला सांगतो कारण त्याला आलियाचे नैसर्गिक ओठ जास्त आवडतात.
आलिया भट म्हणाली, मी ही त्यावेळी फार घाबरले होते, नर्व्हस झाले कारण...
या व्हिडिओमध्ये आलियाने लावलेली लिपस्टिक ही न्यूड शेडची आहे. ही तिची सर्वात आवडती लिपस्टिक शेड असलयाचे तिने सांगितले आहे. इतकेच नव्हे तर तिच्या या आवडत्या लिप्स्टीकबद्दल अधिक सांगताना ती म्हणाली की, हिच न्यूड लिपस्टिक शेड मी माझ्या लग्नातदेखील ओठांवर लावली होती. आपली लिपस्टिक लावण्याची पद्धत ही सामान्य मानली जात नाही, तसेच ती अगदीच विचित्र आहे असे तिचे म्हणणे आहे.
आलियाच्या लिपस्टिक प्रकरणांत रणबीर होतोय ट्रोल...
या व्हिडीओमध्ये आलियाने रणबीरबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओमध्ये आलियाने सांगितले की रणबीरला तिची लिपस्टिक लावण्याची पद्धत आवडत नाही. त्यामुळे तो तिला लिपस्टिक काढायला सांगतो. याच कारणामुळे आलिया न्यूड शेड्स लावते. व्हिडिओमध्ये आलिया आधी विचित्र पद्धतीने लिपस्टिक लावते आणि नंतर ती काढून टाकते. आलियाने सांगितले की, रणबीरला तिचे नैसर्गिक ओठ आवडतात. बॉयफ्रेंड असतानाही तो लिपस्टिक काढायला सांगायचा.आलियाच्या या खुलाश्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं की ‘तो नेहमी तिला का नियंत्रणात ठेवतो ? तिला तिच्या आवडीची लिपस्टिक लावू दे’. आणखी एका यूजरने ‘सारखं माझा नवरा, माझा नवरा’ म्हणत आलियावर निशाणा साधला आहे. तर एकाने लिहिले ‘कंट्रोलिंग नवरा रणबीर’. काहींनी तर त्याला कबीर सिंगची उपमा दिली आहे.