बॉलीवूडमधील क्युट कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची कन्या राहा कपूर (Raha Kapoor) सोशल मीडियात तितकीच चर्चेत असते. हे कपल आपल्या शुटींगच्या बिझी शेड्युलमधून देखील आपल्या मुलीसाठी खास वेळ काढतात. आलियाला बॉलीवूड आणि हॉलीवूड या चित्रपटांमधून घवघवीत यश मिळत असून, ती आपल्याला कामासह लेकीसाठी देखील तितकाच खास वेळ काढते.
नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ज्यात ती फक्त एकटी किंवा पती रणबीर कपूरसोबत दिसत नसून, लेक राहासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राहा आलियाच्या कडेवर दिसत आहे, व ती गप्पा मारत कारमध्ये शिरताना दिसून येत आहे. या व्हिडिओद्वारे राहाची छोटीशी झलक चाहत्यांना पाहायला मिळाली असून, तिचा लूक व्हायरल होत आहे(Alia Bhatt Takes Her 11-Month-Old Baby Girl, Raha For Day Out, Styles Her Hair In Fountain Ponytail).
राहाची हटके झलक-चाहते खुश
८ ऑक्टोबर म्हणजेच रविवारच्या दिवशी आलिया राहासोबत स्पॉट झाली. या व्हिडिओमध्ये आलियाने कॅज्युअल क्रीम-टोन्ड आउटफिट कॅरी केला होता, व तिच्या काखेत छोटी राहा देखील होती. राहाने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला असून, तिचे केस दोन फाउंटन पोनीटेलमध्ये बांधलेले होते. परंतु, अद्याप तिचा चेहरा कॅमेऱ्यासमोर आला नसून, तिची पाठची बाजू कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राहाचा हा क्युट लूक चाहत्यांना आवडला आहे, व नेटकऱ्यांनी राहाच्या गोड लूकचे कौतुकही केले आहे.
लहान मुलांना क्युट लूक देते फाउंटन पोनीटेल
सहसा आपण पाहिलं असेल की, लहान मुलांचे केस फाउंटन पोनीटेलने बांधले जाते. लहान मुलांचे केस हे नाजूक व लहान असतात. जे सातत्याने त्यांच्या डोळ्यांवर येतात. त्यामुळे बहुतांश महिला लहान मुलांचे केस फाउंटन पोनीटेलने बांधण्यास प्राधान्य देतात. ज्यामुळे मुलांचे लहान केस डोळ्यांसमोर येत नाही, व त्यांची चिडचिडही होत नाही. पोनीटेलची ही फॅशन कधीच जुनी होऊ शकत नाही. कारण या लुकमुळे महिला किंवा लहान मुलांना एक क्युट लूक मिळतो.
वयात आलेल्या मुलांशी बोलताना पालक हमखास करतात ४ चुका, म्हणून मुलं आईबाबांशी बोलणं टाळतात
लेकीसोबत फिरायला आवडते
तुमचीही मुलं मोबाईल फोनवर तासंतास घालवतात? ५ सोपे उपाय, सवय सुटेल - मुलं लागतील अभ्यासाला
इनस्टाइल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत आलियाने मुलगी राहाविषयी सांगितले होते की, 'मला राहाला भारतात बाहेर फिरवायला किंवा वॉकसाठी घेऊन जायला खूप आवडते. परंतु, तिला फिरवण्याची संधी फक्त परदेशातच मिळते.' ती पुढे म्हणते, 'भारतात मी राहाला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकत नाही. आमच्यासाठी हे थोडे रिस्की आहे, असे मला वाटते.'