Join us

आलिया भटच्या 'स्वीटहार्ट' कट लेहेंगा चोलीची फॅशन नेमकी कुठं चुकली? ये फॅशन है क्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 15:22 IST

Social Viral: ही असली कसली भलतीच फॅशन, असं म्हणत नेटकरी सध्या आलियाला (actress Alia Bhatt) जबरदस्त ट्रोल (troll) करत आहेत... त्या पार्टीत खरंतर आलिया खूप सुंदर दिसत होती. पण तिच्यापेक्षा तिच्या बोल्ड लूक असणाऱ्या ब्लाऊजचीच जास्त चर्चा झाली...

ठळक मुद्देलेहेंगा खरोखरंच खूप सुंदर होता. पण लेहेंगाच्या ब्लाऊजमुळे मात्र सगळीच गडबड होऊन गेली.

आलिया नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. कधी तिचं आणि रणबीरचं नातं, तर कधी तिने केलेलं एखादं स्टेटमेंट... आता मात्र जबरदस्त चर्चा रंगली आहे ती तिच्या ब्लाऊजची. या ब्लाऊजची स्टाईल खूपच वेगळी होती हे मात्र अगदी खरं... त्याचं झालं असं की आलियाची जवळची मैत्रीण अनुष्का रंजन (Anushka Ranjan) हिच्या लग्नाचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी आलिया फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी डिझाईन केलेला एक लेहेंगा घालून गेली होती. पिवळा, पोपटी आणि गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन असणारा हा लेहेंगा खरोखरंच खूप सुंदर होता. पण लेहेंगाच्या ब्लाऊजमुळे मात्र सगळीच गडबड होऊन गेली.

 

'गडबडीत आलिया उलटं ब्लाऊज घालून आली की काय?', 'फॅशनच्या नावाखाली काही पण....', 'ये आलिया कब से उर्फी बन गयी?', 'fashion disaster award goes to miss alia bhatt' अशा कित्येक कमेंट तिला यानिमित्ताने मिळाल्या आहेत. आलियाचं जे ब्लाऊज होतं ते हिरव्या, गुलाबी आणि पिवळ्या रंगाचंच होतं. गळ्याजवळ ब्लाऊजला एकदम स्ट्रेट आडवा कट होता. पण खालच्या बाजूने केलेली ब्लाऊजची कटींग मात्र अतिशय विचित्र होती. या ब्लाऊजची खालच्या बाजूने केलेली कटींग 'स्वीटहार्ट' कट म्हणून ओळखली जाते. सामान्यपणे असा कट ब्लाऊजच्या वरच्या बाजूला असतो. पण तो आलियाच्या ब्लाऊजला खालच्या बाजूने असल्याने त्याचा लूक अनेकांना आवडला नाही. त्यामुळेच आलिया ब्लाऊज उलटं घालून आली की काय, अशी कमेंट तिला अनेक जणांनी दिली. या लूकमध्ये आलिया मात्र अतिशय हाॅट दिसत होती एवढं मात्र खरं..

 

मिलिंद सोमण म्हणतो, पेट भर के खाओ, फिट रहो! 'ही' पथ्यं मात्र विसरू नकाच..

कसा होता आलियाचा लेहेंगा ?अनुष्का रंजनच्या संगीत सोहळ्यासाठी आलियाने घातलेला लेहेंगा मनिष मल्होत्रा यांच्या नुरीयत कलेक्शनपैकी एक होता. या लेहेंग्याचा बेस गुलाबी रंगाचा होता आणि त्यावर पिवळ्या आणि पोपटी रंगाने हॅण्ड एम्ब्रॉयडरी केलेली होती. ओढणीवर तसेच लेहेंग्यावरही अनेक ठिकाणी मोठ्या नजाकतीने सोनेरी रंगाने थ्रेडवर्क केलेले होते. लेहेंग्यावरची नक्षी अतिशय रेखीव आणि नाजूक होती. हा लेहेंगा घातल्यानंतर आलियाने कानात फक्त मोठे झुमके घातले होते. खूपच मोजके दागिने घालूनही आलिया सुंदर दिसत होती. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाआलिया भटफॅशनसेलिब्रिटीमनीष मल्होत्रा