Lokmat Sakhi >Social Viral > Allu Arjun dance: लग्नाच्या पंगतीत दोस्तांचा श्रीवल्ली डान्स; पाहा हातात प्लेट घेऊन नाचणारे अल्लू अर्जून, व्हिडिओ व्हायरल

Allu Arjun dance: लग्नाच्या पंगतीत दोस्तांचा श्रीवल्ली डान्स; पाहा हातात प्लेट घेऊन नाचणारे अल्लू अर्जून, व्हिडिओ व्हायरल

Social viral: सध्या श्रीवल्ली गाण्यातली (shrivalli song) अल्लू अर्जूनची स्टाईल (Allu Arjun style) जबरदस्त हीट झाली आहे... बघा या स्टाईलचे असेच काही चाहते..  लग्नात जेवण वाढून घेण्यासाठी त्यांनी चक्क अल्लू अर्जून स्टाईल केली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 01:39 PM2022-02-09T13:39:28+5:302022-02-09T13:41:09+5:30

Social viral: सध्या श्रीवल्ली गाण्यातली (shrivalli song) अल्लू अर्जूनची स्टाईल (Allu Arjun style) जबरदस्त हीट झाली आहे... बघा या स्टाईलचे असेच काही चाहते..  लग्नात जेवण वाढून घेण्यासाठी त्यांनी चक्क अल्लू अर्जून स्टाईल केली...

Allu Arjun style shrivalli dance at wedding buffet, trending video | Allu Arjun dance: लग्नाच्या पंगतीत दोस्तांचा श्रीवल्ली डान्स; पाहा हातात प्लेट घेऊन नाचणारे अल्लू अर्जून, व्हिडिओ व्हायरल

Allu Arjun dance: लग्नाच्या पंगतीत दोस्तांचा श्रीवल्ली डान्स; पाहा हातात प्लेट घेऊन नाचणारे अल्लू अर्जून, व्हिडिओ व्हायरल

Highlightsलग्नात गेल्यावर जेवण घेण्याची श्रीवल्ली स्टाईल पाहिली का? बघा हा जबरदस्त व्हायरल व्हिडिओ !

पुष्पा चित्रपटाची (Pushpa movie) सध्या जबरदस्त क्रेझ सुरू आहे.. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळेच जणं पुष्पाची चर्चा करताना दिसत आहेत.. पुष्पाचे डायलॉग आणि त्यातली गाणी तर आता प्रत्येकाच्या तोंडात  असून अगदी गल्लीबोळातूनही ऐकू येऊ लागली आहेत.. म्हणूनच तर श्रीवल्ली गाण्यावर काही उत्साही मित्रांनी केलेला डान्स (Allu Arjun style shrivally dance at wedding buffet) सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. जेवण वाढून घेण्याची त्यांची अल्लू अर्जून स्टाईल नेटकरींना भारीच आवडली असून ते या मित्रांवर जाम फिदा झाले आहेत.

 

पुष्पा चित्रपटातलं 'तेरी झलक.....' हे गाणं वाजू लागलं की आपोआपच आपल्या डोळ्यासमोर एक खांदा वर, एक खांदा खाली केलेला अल्लू अर्जून येतो.. नकळतंच मग आपणही त्याची स्टाईल फॉलो करू लागतो.. अगदीच साधी आणि सोपी असणारी ही स्टाईल करताना अल्लू अर्जूनला बघणं खूपच मजेदार आणि गमतीशीर आहे.. हीच स्टाईल अगदी अचूक पद्धतीने हेरली आहे या काही मित्रांनी...

 

हा अल्लू अर्जून स्टाईल डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या razishaikh6andatrangz या पेजवर शेअर (instagram video) करण्यात आला आहे. यामध्ये असं दिसतंय की कोणता तरी समारंभ चालू आहे. त्यात बुफे पद्धतीने जेवण मांडलेलं आहे.. दोन तरूण आणि एक तरूणी या बुफेच्या रांगेत ताट हातात घेऊन उभे आहेत. एकेक पदार्थ वाढून घेत पुढे जाताना ते पुष्पा चित्रपटातल्या श्रीवल्ली गाण्यातल्या अल्लू अर्जून स्टाईलची कॉपी करत आहेत... तिघांना अशा पद्धतीने जेवण वाढून घेताना पाहून खूपच मजा येते.. Dinner with atrangz on this trend 😂 अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली असून आजवर दिड लाखांपेक्षा अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. 

 

Web Title: Allu Arjun style shrivalli dance at wedding buffet, trending video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.