Join us  

केळीच्या सालींचे भन्नाट उपयोग! तुम्ही कधी विचारही केला नसेल इतके वेगवगळे ६ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2024 4:39 PM

Amazing Benefits Of Banana Peels: केळीच्या सालींचे हे वेगवेगळे उपयोग जर तुम्ही पाहिले, तर यानंतर कधीही केळीच्या साली तुम्ही कचऱ्यात टाकून देणार नाही... (how to reuse banana peels?)

ठळक मुद्दे केळीच्या सालींचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे सांगितले आहेत. ते नेमके कोणते ते पाहा...

पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात देणारी केळी आरोग्यवर्धक आहेत. बद्धकोष्ठतेचा त्रास तसेच पोटाचे इतर विकार कमी करून भरपूर एनर्जी देण्यासाठी केळी फायदेशीर ठरते. त्यामुळे दररोज एक केळी तरी खायलाच पाहिजे, असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात. त्यानुसार आपण केळी खातो आणि तिची सालं मात्र टाकून देतो (amazing benefits of banana peels). पण केळी जेवढी आरोग्यासाठी पोषक आहे, तेवढ्याच केळीच्या साली विविध कामांसाठी उपयोगी आहेत (how to re use banana peels?). केळीच्या सालींच्या मदतीने तुम्ही कोणकोणती कामे अगदी चटकन करू शकता ते पाहा...(various uses of banana peels)

 

केळीच्या सालींचे उपयोग

केळीच्या सालींचे किती वेगवेगळे उपयोग आहेत, याविषयीचा व्हिडिओ thatangloindiansindhi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये केळीच्या सालींचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे सांगितले आहेत. ते नेमके कोणते ते पाहा...

केस एवढे वाढतील आणि दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल, बघा त्यासाठी काय करावं....

१. केळीच्या साली त्वचेसाठी अतिशय उपयोगी आहेत. केळीच्या साली त्वचेवर घासल्यामुळे त्वचेवरची डेड स्किन निघून जाते. तसेच त्वचा छान हायड्रेटेड होऊन पोषण मिळते. त्वचा चमकदार होण्यासाठी केळीच्या साली आठवड्यातून २ ते ३ वेळा तरी त्वचेवर घासा.

Priyanka Chopra Birthday: प्रियांका चोप्राचा 'हा' संघर्ष कुणीच पाहिला नाही, त्यामुळेच तर ती आज.....

२. केळीच्या साली मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट चांदीच्या भांड्यांना १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर घासणीने भांडी घासून घ्या. चांदीची भांडी अगदी चकाचक होतील.

 

३. केळीच्या साली ५ ते १० मिनिटांसाठी डोळ्यांखालच्या भागावर ठेवा. असं केल्याने डोळ्यांखाली जर सूज आली असेल तर ती कमी होते. तसेच डार्क सर्कल्स कमी होण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

आषाढ स्पेशल खुसखुशीत गोड पुऱ्या करण्याची सोपी रेसिपी- बच्चे कंपनीसह मोठेही आवडीने खातील... 

४. बुटांवर चमक येण्यासाठी केळीच्या साली उपयुक्त ठरतात. यासाठी बुटांवर ती घासा आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घ्या. बुटं पॉलिश केल्याप्रमाणे चकाचक होतील.

५. केळीची सालं एक ते दोन दिवसांसाठी पाण्यात भिजत घाला. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि ते रोपांना द्या. रोपांसाठी ते एक उत्तम खत असतं. फुलझाडांना भरपूर फुलं येण्यासाठी तर ते विशेष उपयोगी आहे.

६. कुंडीमध्ये छोटासा खड्डा करा आणि त्यात केळीच्या सालींचे तुकडे करून टाका. झाडांची भरभरून वाढ होईल. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्सब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेळी