सोशल मिडियावर नेहमीच काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यापैकी काही खरोखरच मजेशीर असतात, काही प्रेरणादायी असतात तर काही अतिशय कलात्मक असतात. असे काही कलात्मक व्हिडिओ (video of amazing rangoli) बघून अनेक जणी त्यातून प्रेरणा घेतात, नवं काहीतरी शिकतात. सध्या नवरात्री सुरू आहे. त्यामुळे रांगाळी, सजावट, पाककृती, गरबा- दांडिया नृत्य अशा कलागुणांना बहर आलेला आहे. म्हणूनच या विषयांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या ट्रेण्डिंग आहेत. त्यापैकीच हा एक व्हिडिओ खरोखरच कौतूकास्पद आहे.
RPG ग्रुपचे चेअरपर्सन हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. नवरात्रीनिमित्त सुरू असणाऱ्या रांगोळी स्पर्धेचा हा व्हिडिओ आहे.
दररोज करा बालासन, रोज छळणारी पाठदुखी होईल गायब, शरीर आणि मन दोन्ही होईल रिलॅक्स..
ही रांगोळी स्पर्धा खरोखरच आगळी- वेगळी असून यात महिलांनी दाखवलेली कलात्मकता अप्रतिम आहे, अशा शब्दांत हर्ष गोयंका यांनी महिलांच्या कलात्मकतेचे कौतूक केले आहे. व्हिडिओमध्ये तब्बल ८- १० जणी दिसत आहेत. या स्पर्धेची थीम खरोखरच खूप वेगळी आहे. कारण स्पर्धकांना आपल्या पदरावरची किंवा ओढणीवरची नक्षी रांगोळीतून साकारायची आहे..
Unique rangoli competition…amazing to see the crafts of our people! pic.twitter.com/6dgSU6J42L
— Harsh Goenka (@hvgoenka) September 29, 2022
आपण नेहमी बघत असतो त्या सगळ्याच रांगोळ्या साचेबद्ध असतात. किंवा रांगोळ्यांचा ठराविक पॅटर्न ठरलेला असतो.
नवरात्र स्पेशल पदार्थ: खूप अशक्तपणा वाटतो? अंगात ताकदच नाही? खा सातूचे पीठ- फायदे ५
पण या रांगोळ्या मात्र अगदी वेगळ्या आहेत. महिलांनी अक्षरश: जीव ओतून त्या काढल्या आहेत, हे जाणवते. काही काही जणींचे डिझाईन तर एवढे सुंदर आले आहेत, की आपण खराखुरा पदर बघतो आहोत की रांगोळीतलं डिझाइन बघतो आहोत, हे क्षणभर पाहणाऱ्याला कळतच नाही.