वय हा काही जणांसाठी केवळ एक आकडा असतो. कारण तो आकडा कितीही वाढला तरी त्याचा त्यांच्या उत्साहावर, कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही आणि ते त्या वाढत्या आकड्याचा उगाच बाऊही करत नाहीत. त्याउलट काही मंडळी अशीही असतात, ज्यांना अवघ्या तिशी- पस्तिशीतच वय वाढल्याचं (skating at old age) फिलिंग येऊ लागतं. म्हणूनच अशा दुसऱ्या प्रकारात मोडणारे जे काही लोक आहेत, त्या सगळ्यांसाठीच या ८६ वर्षांच्या आजीबाईंचा (Skating by 86 years old granny) व्हिडिओ अतिशय प्रेरणादायी (inspiring viral video) ठरणारा आहे.
इन्स्टाग्रामच्या the_griffin_brothers__ या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो सध्या सोशल मिडियावर प्रचंड गाजतो आहे. ग्रिफीन ब्रदर्स हे दोघेही अमेरिकेतले प्रोफेशनल आणि नामांकित स्केटर्स आहेत. या आजी बहुतेक त्यांच्याकडेच स्केटिंग शिकायला येत असाव्या, असा अंदाज आहे. या दोघांनीच या आजींचा व्हिडिओ शेअर केला असून वयाचा बहाणा कोणीही देऊ नये, अशी कॅप्शन त्या व्हिडिओला दिली आहे. या आजींकडे या वयात एवढी शक्ती आणि चपळाई कशी आली, हा प्रश्न नेटकरी त्यांना विचारत आहेत.
एखादी आपली आवडती गोष्ट करण्यातला आनंद आणि समाधान काय असतो, हे त्या आजींच्या चेहऱ्याकडे पाहून जाणवतं. त्यांच्या आजुबाजुला अनेक तरुण लोक दिसत आहेत. बरेच जण अगदी आरामात एकमेकांशी गप्पा मारत स्क्रेटिंग करत आहेत. पण या आजी मात्र एकट्याच स्वत:च्या धुंदीत असून आनंदाने मुक्तपणे अगदी झरझर स्क्रेटिंग करत आहेत. एवढंच नाही तर स्केटिंंग करताना थोडेफार स्टंट करण्याचा त्यांचा प्रयत्नही सुरू आहे. यामध्ये त्या मध्येच जलद गतीने धावत असून धावताना अलगदपणे कधी डावा तर कधी उजवा पाय उचलत आहेत. त्यांचा स्पीड आणि त्यांची चपळाई दोन्हीही अजब असून नेटकरी म्हणूनच तर हा व्हिडिओ बघून थक्क होत आहेत.