विद्यार्थ्यांसोबत नृत्य करणारा शिक्षकाच्या भुमिकेतला आमीर खान आपण चित्रपटातच पाहतो. वास्तवात असे शिक्षक असतील, हे खरंही वाटत नाही. कारण कडक शिस्तीचे, विद्यार्थ्यांना धाकात ठेवणारे, त्यांना गणित- विज्ञान असे अवघड विषय अतिशय गंभीर मुडमध्ये शिकविणारे, अशीच शिक्षकांची एक सर्वसाधारण इमेज आपल्या डोळ्यासमोर असते. अर्थात याला अपवादही अनेक शिक्षक असतातच. पण विद्यार्थ्यांसोबत रमून आणि त्यांच्या कलाकलाने घेत त्यांच्यासोबत नृत्य करणारा शिक्षक किंवा शिक्षिका क्वचितच दिसून येतात.(school teacher's dance with her student)
म्हणूनच तर सोशल मिडियावर सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकरींचे लक्ष वेधून घेतले आहे. विद्यार्थिनीचं बघून बघून तिच्यासोबत डान्स करणाऱ्या एका शिक्षिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. @ManuGulati11 या ट्विटर पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून "Students love to be teachers. They love role reversal", अशी सुंदर कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे.. हा व्हिडिओ खरोखरंच अतिशय छान असून बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर नक्कीच एक स्मितहास्य फुलतं..
या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की कोणतीही सर्वसाधारण शाळा असते, तशीच ही पण एक शाळा आहे. सगळ्या मुलीच असल्याचे ते एखादं गर्ल्स हायस्कूल असावं. सगळ्या विद्यार्थिनी वर्गात बसलेल्या आहेत आणि एक विद्यार्थिनी सगळ्यांच्या समोर नृत्य करते आहे. तिच्यासोबत तिच्या मॅडमपण आहेत. विद्यार्थिनीचा डान्स पाहून शिक्षिकेलाही थोडे नृत्य करावे वाटते आहे. हे ओळखूनच इतर विद्यार्थिनी त्यांना ''मॅम आप भी करो ना...'' असं म्हणत आग्रह करत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनीच्या आग्रहाखातर मॅडमनी त्यांच्यासोबत छान नृत्य केले. ती मुलगी नृत्य करते आहे, ती मॅडमला स्टेप्सही शिकवते आहे. विद्यार्थिनीला फॉलो करत करत तिच्याकडून नृत्य शिकणाऱ्या या मॅडमचा कुल ॲटिट्यूड नेटकरींना भारीच आवडला आहे.