नृत्य- गायन या भारतीय कला, भारतीय स्वयंपाक घरात तयार होणारे वेगवेगळे चवदार पदार्थ.. भारतीय लोकांची सण- उत्सव साजरे करण्याची परंपरा, भारतीय पोशाख, योगसाधना या सगळ्याच गोष्टी हळूहळू परदेशी नागरिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत. कारण या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येणारी खासियत, त्यातली नजाकत आणि त्यांचे वेगळेपण आता जगाच्या नजरेत ठसठशीत उठून दिसत आहे. म्हणूनच तर कधी एखादी रशियन तरुणी आलू के पराठे करण्याचा घाट घालते तर कधी अशी एखादी अमेरिकन महिला भारतीय संगीताच्या (American dancer's Bhangra love) प्रेमात पडते.
सध्या सोशल मिडियावर या अमेरिकन महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (viral video) होत आहे. ओमाला Omala असं तिचं नाव. ती एक डान्सर आहे. olly_.g हे तिचं इन्स्टाग्राम (instagram share) पेज पाहिलं तर क्षणभर ती भारतीय की अमेरिकन असं कन्फ्युजन झाल्याशिवाय राहात नाही. कारण तिच्या जवळपास सगळ्याच पोस्टमध्ये ती कपाळावर टिकली, पंजाबी ड्रेस, ओढणी अशा भारतीय थाटात दिसते. तिने तिच्या डान्सचे अनेक रिल्स इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आणि विशेष म्हणजे या सगळ्या रिल्समध्ये ती भारतीय गाण्यांवर आणि विशेषत: पंजाबी गाण्यांवर भांगडा करताना दिसते आहे.
प्रत्येक गाण्यावर तिने केलेला भांगडा खरोखरंच अतिशय खास असून अत्यंत ग्रेसफुली ती नाचते आहे. भांगडा करताना जो काही उत्साह किंवा एक प्रकारचा चार्म लागतो, तो तिच्यात अगदी ठसठसून भरलेला आहे, असंच वाटतं. अगदी बारकाईने तिने भारतीय भांगडा डान्सर्सचे सगळे बारकावे टिपले असून ते आपल्या नृत्यातून ती जसेच्या तसे सादर करण्याचा प्रयत्न करते. तिची तब्येतही काही अगदी स्लिमट्रिम नाही.. बऱ्यापैकी जाड असं तिचं वर्णन करता येईल. पण तरीही ती ज्या पद्धतीने डान्स करतेय, जी एनर्जी दाखवतेय, ती खरोखरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच तर तिचे अनेक डान्स व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.