सोशल मिडियावर हल्ली एक से एक व्हिडिओ चर्चेत असतात... काही इमोशनल, काही डेंजर तर काही अगदी पोट धरून हसायला लावणारे. अशाच आशयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) चर्चेत आहे. लहान मुलं असो किंवा मग मोठी माणसं. कुणीही जेव्हा एखादी भाषा पहिल्यांदा शिकतो आणि त्यातले थोडे थोडे शब्द बोलू लागतो, तेव्हा त्यांच्या तोंडून ती भाषा ऐकण्यात वेगळाच गोडवा जाणवतो. नविन उच्चारांमध्ये असणारा वेगळाच हेल अतिशय गमतीशीर वाटतो. असंच काहीसं मजेदार बोलतोय एक अमेरिकन जावई. (American Son-in Law)
goofwoman या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका भारतीय तरुणीनेच हा तिच्या नवऱ्याचा व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये तिचा अमेरिकन नवरा तिच्या मागे झोक्यात बसला आहे आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या भारतीय सासू- सासऱ्यांशी बोलतो आहे. सासू- सासऱ्यांशी बोलताना तो पहिल्यांदा ''राधास्वामी मामा- राधास्वामी पापा..'' म्हणून ग्रीट करत आहे. यात 'ममा' हा शब्द 'मामा' म्हणून त्याने उच्चारताच त्याच्या बायकोची हसून हसून पुरेवाट झाली आहे. ''ठिक है...'', ''आप कैसे हो..'' असं म्हणून तो त्यांची विचारपूसही करत आहे. 'आय एम वर्किंग ऑन माय हिंदी' असं म्हणत त्याने 'क' ची बाराखडीही त्यांना म्हणून दाखवली...
अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. पण सोशल मिडियावर तो कमालीचा गाजतो आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून जवळपास ५० हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. यात ही तरुणी म्हणते आहे की तिच्या अमेरिकन नवऱ्याला आतापर्यंत जेमतेम २० हिंदी शब्द समजले आहेत, पण तरीही अशा पद्धतीने मोडक्या- तोडक्या हिंदीत सासू- सासऱ्यांशी संवाद साधायला ते पुरेसे आहेत.