Join us  

Singer katy sanskrit word written on Hand : अमेरिकन सिंगरनं हातावर गोंदवला संस्कृत शब्द; या शब्दाचा अर्थ माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 6:07 PM

American popular singer katy perry has got a sanskrit word written on Hand : तिच्या हातावर टॅटूच्या रूपात 'अनुगच्छतु प्रवाहं' असा संस्कृत शब्द आहे. 'अनुगच्छतु प्रवाहं' चा अर्थ खूप गहन आहे.

संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचे आकर्षण आहे. याशिवाय जगातील अनेक प्रसिद्ध देशांच्या संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. सोशल मीडियावर सध्या अमेरिकन सिंगर तुफान चर्चेत आली आहे. अमेरिकेतील लोकप्रिय गायिका ही तिच्या हातावरील संस्कृत भाषेतील टॅट्यूमुळे प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे.   (American popular singer katy perry has got a sanskrit word written on her hand)  

कॅटी पेरीने  (katy perry)  तिच्या हातावर संस्कृत शब्दाचा टॅट्यू काढला आहे. केटी पेरी केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात गायिका, अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या हातावर टॅटूच्या रूपात 'अनुगच्छतु प्रवाहं' असा संस्कृत शब्द आहे. 'अनुगच्छतु प्रवाहं' चा अर्थ खूप गहन आहे. या शब्दाचा अर्थ 'काळानुसार चालणे' असा होतो. 

 १८ वर्षीय लेडी डॉन थेरगाव क्विन आहे तरी कोण? शिवीगाळ करणारे व्हिडिओ का बनवले? वाचा

जिथे एकीकडे भारतीय  तरूणांना भारतीय संस्कृतीची फारशी पर्वा नाही असं काहीवेळा दिसून येतं. दुसरीकडे परदेशातील नामवंत लोकांना भारतीय संस्कृतीचे वेड आहे. कॅटी पेरी व्यतिरिक्त अभिनेता, रेडिओ होस्ट, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता रसेल ब्रँडनेही हातावर टॅटू काढण्यासाठी संस्कृत शब्दांचा वापर केला होता. 

कोण म्हणतं व्हेज जेवणात प्रोटीन कमी असतं? ४ पदार्थ खा नेहमी फिट, हेल्दी राहाल

त्याच्या डाव्या हातावर 'ओम नमः शिवाय' हा मंत्र लिहिला आहे. याशिवाय अमेरिकन गायिका नृत्यांगना आणि कोरिओग्राफर किम्बर्ली व्याट हिच्या मानेच्या मागील बाजूस संस्कृत श्लोक लिहिलेला आहे. तिच्या मानेच्या मागच्या बाजूला टॅट्यू म्हणून 'लोक: समस्त: सुखिनो भवन्तु' लिहिलेले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलअमेरिका