काळ बदलत गेला की, बऱ्याच गोष्टी बदलतात (Generatin Z). सध्या जेन झीचा जमाना आहे. पण बहुतांश लोकांना जेन झी म्हणजे काय? हे ठाऊक नाही. १९९७ ते २०१२ या काळामध्ये जन्मलेल्या मुलांना जेन झी म्हणतात (Kaun Banega Crorepati). यांची भाषा, राहणीमान बऱ्याच गोष्टी हटके आहेत. मुख्य म्हणजे ते वापरत असलेली भाषा, जेन झीची भाषा नव्या पिढीला लवकर समजत नाही (Amitabh Bachchan). 'कौन बनेगा करोडपती'मध्येअमिताभ बच्चनही या भाषेतले संदर्भ ऐकून चकीत झाले.
जेन झीची नाती, त्यामागची मानसिकता, स्लँग म्हणून वापरले जाणारे शब्द, संकल्पना त्यांनाही नवीन होतो. हॉट सीटवर बसलेल्या तरुण मुलीने बच्चन यांना मग समजावून सांगितले की नेमकी ही भाषा आणि त्याचे अर्थ काय होतात(Amitabh Bachchan cracks up as KBC 16 contestant advises him to try ‘benching’ wife Jaya Bachchan, explains Gen Z dating lingo).
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अमिताभ बच्चन हॉटसीटवर बसलेल्या लोकांसोबत विविध गोष्टींवर चर्चा करतात. गप्पा मारतात. जीवनात कुणी किती संघर्ष केला याबद्दल माहिती घेतात.
पांढरे केस - हेअर फॉलही जास्त होतो? खोबरेल तेलात मिसळा २ गोष्टी; केस होतील दाट - दिसतील सुंदर
एक व्हायरल व्हिडिओ सांगतो की हॉटसीटवर बसलेल्या रितीका कुमारीला बच्चन साहेबांनी तिच्या छंदाबद्दल विचारले. तेव्हा तिने सांगितले की, 'मित्रांना रिलेशनशिप सल्ले द्यायला मला आवडतं. कारण आजच्या तरुणांना रिलेशनशिपमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बेचिंग, घोस्टिंग, ब्रेडक्रंबिग..असे किती प्रश्न आहेत!’
हे शब्द ऐकून अमिताभ बच्चन यांना प्रश्न पडला. त्यांनी विचारलं, 'ब्रेडक्रंबिग म्हणजे चपाती खाणं असं का?' रितिकाने मग त्यांना शब्दांचे अर्थ समजावून सांगितले. रितिका म्हणते, 'सर, ब्रेडक्रंबिग म्हणजे नातेसंबंधात कोणत्याही प्रकारची वचनबद्धता टाळणे. ते रिलेशनशिपमध्ये असतात पण कुणाला काही सांगत नाही. ओळख असल्यासारखे वागतात. कमिटमेण्टला घाबरतात.’
तर, घोस्टिंग म्हणजे इग्नोर करणे. जर एखाद्या व्यक्तीला आपण वारंवार मेसेज करतो, आणि ती व्यक्ती वारंवार तुम्हाला इग्नोर करत असेल तर, याला घोस्टिंग म्हणतात. अनेकदा जोडीदार असे एकमेकांना घोस्टिंग ट्रिटमेण्ट देतात. तर शेवटचं आहे बेचिंग. त्याचं मात्र तिनं फार गमतीशीर उदाहरण दिलं. ती सांगते. म्हणजे काय तर आपण दोघे एका बेंचवर आहोत.
म्हणजे उदा. आता तुम्ही आणि मी. आणि तिकडे लांब अभिषेक पण बसलेले आहेत. तर माझी नजर तिकडेही आहे. म्हणजे एका नात्यात असताना समजा ब्रेकअप झाला तर बॅकअप प्लॅन म्हणजे यानंतर लायनीत कोण असा विचार अनेकजण करतात. मुलं मुली त्याला बेंचिंग म्हणतात.
यावर अमिताभ बच्चन खळखळून हसले. तेव्हा त्यांनी रितिकाला ' मग माझं बॅकअप प्लॅन कोण असेल आता? असा प्रश्न विचारला. तेव्हा रितिका त्यांनाही बेचिंग करण्याचा सल्ला देते. तेव्हा, अमिताभ 'बेंच खुप छोटा आहे' असं म्हणतात. तेव्हा रितिका म्हणाली, एक साईड मला ठेवा आणि दुसऱ्या साईडला जया मॅम, असं म्हणते. तेव्हा उपस्थित लोक आणि अमिताभ बच्चन खूप हसले आणि नव्या पिढीची ही भाषा आणि नाती मला समजणारी नाहीत असं हसतच म्हणाले.