बिग बी अमिताभ बच्चन यांची ओळखच 'Angry Young Man' अशी आहे. त्यांना मिळालेल्या भुमिकांमुळे त्यांची तशी ओळख तयार झाली असली तरी घरी ते नेहमीच कुल असतात. पण तरीही कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीलाच कशाचा तरी राग येतोच. कितीही संयमी व्यक्ती असली तरी तिला एखादी गोष्ट मुळीच आवडत नाही. त्यामुळे त्या गोष्टीचा भयंकर तिटकारा येतो. असंच काहीसं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचंही आहे. खासकरून घरातल्या स्त्रियांबाबत असणाऱ्या एका गोष्टीबाबत अमिताभ बच्चन यांना खूप राग यायचा. ती गोष्ट नेमकी कोणती होती, याची माहिती त्यांच्याच कन्येने म्हणजेच श्वेता बच्चन (Shweta Bachchan) हिने नव्यानवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिच्या पॉडकास्ट कार्यक्रमात दिली आहे.
श्वेता बच्चन यांची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा एक पॉडकास्ट शो करते. यादरम्यान केलेल्या सिरिजमध्ये तिने तिच्या आईला आणि आजी जया बच्चन यांना एक प्रश्न विचारला असता, त्याप्रश्नाचं उत्तर देताना श्वेता बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना कोणती गोष्टी अजिबात आवडायची नाही,
मनिष मल्होत्रांच्या आकाशी साडीत खुलले माधुरीचे सौंदर्य- रेशमाची जर असलेल्या साडीची बघा नजाकत
याविषयीचा खुलासा केला आहे. श्वेता म्हणते की अमिताभ बच्चन यांना असं वाटायचं की घरातल्या मुलींनी नेहमीच लांब केस ठेवावेत. मुलींनी केस कापलेले पाहिले की ते चिडायचे आणि लगेचच त्याविषयी त्यांना जाब विचारायचे. त्यामुळे श्वेता यांनी अमिताभ यांच्या रागापायी बऱ्याचदा केस कापणं टाळलं.
या मुलाखतीदरम्यानच श्वेता यांनी त्यांच्या लहानपणीचा आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. लहानपणी भाऊ अभिषेक बच्चन याने श्वेता यांचे डोक्याच्या अगदी मध्य भागावरचे केसच कात्रीने कापून टाकले होते.
कोणती पारंपरिक साडी कुठून खरेदी करावी? बघा खास माहिती
त्यानंतर दोघा भावंडांमध्ये चांगलीच भांडाभांडी झाली. अशा विचित्र पद्धतीने कापलेल्या केसांमुळे श्वेताला शाळेत जायलाही अगदी नकोसे व्हायचे. मग ते कापल्यामुळे वाकडेतिकडे झालेले केस झाकून जातील, अशा पद्धतीने जया बच्चन यांना श्वेताची हेअरस्टाईल करावी लागायची... हा किस्सा सांगताना मायलेली दोघीही खळाळून हसल्या...