Join us  

तांदळाच्या पीठापासून आकर्षक रांगोळी काढली, पक्ष्यांचा थवा येताच असं काही झालं, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 12:01 PM

An Attractive Rangoli Made From Rice Flour : खरंतर, यामागे एक हृदयद्रावक कारण आहे, जे जाणून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.

सोशल मीडियावर प्राण्यापक्ष्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओज चकीत करतात तर काही मनाला भिडतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्या पक्षांचा एक थवा दिसत आहे. पक्ष्यांना दाणे खाऊ घालण्याची  नवी पद्धत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अनेकजण रोज घराच्या प्रवेशद्वारावर किंवा देवघराजवळ रांगोळी काढतात. पांढऱ्या रंगाने रांगोळी काढताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल. काही लोक पिठापासून रांगोळी तयार करतात, तर काही लोक तांदळाच्या दाण्यापासून रांगोळी काढतात. (Birds viral video group of birds arrived to eat rangoli made from rice flour)

खरंतर, यामागे एक हृदयद्रावक कारण आहे, जे जाणून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. अलीकडे तांदळाच्या पिठापासून बनवलेली रांगोळी पाहायला मिळत आहे, त्याभोवती पक्ष्यांचा थवा ते आनंदाने खाताना दिसतात. सहसा बरेच लोक पक्षी आणि वन्य प्राण्यांना खायला घालताना दिसतात. आजकाल पक्ष्यांना खायला देण्याची ही नवीन पद्धत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सनराइज हॅक नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, रांगोळी बनवण्यासाठी पांढऱ्या दगडाच्या पावडरऐवजी तांदळाच्या पिठाचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे पक्षी ते खाताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना सांगण्यात आले आहे की ही रांगोळी भारतातली नसून मलेशियामध्ये तयार केली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. हा व्हिडीओ खूप पाहिला जात आहे आणि खूप पसंत केला जात आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया