Join us  

कूकरच्या झाकणाची गॅस्केट सैल झाली? शिट्ट्याच होत नाही? ३ भन्नाट युक्त्या, कूकरचं काम जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 5:04 PM

An easy tip for fixing a leaky gasket in a Pressure Cooker : प्रत्येक घरात प्रेशर कूकरचा वापर होतो; पण याचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं

प्रत्येकाच्या घरात दररोज स्वयंपाक केला जातो. दररोज अन्न शिजवले जाते (Cooking Tips). अन्न शिजवण्यासाठी बरेच जण विविध भांड्यांचा वापर करतात. मुख्य म्हणजे प्रेशर कूकरचा वापर डाळ-भात शिजवण्यासाठी हमखास होतो (Pressure Cooker). प्रेशर कूकरमध्ये अन्न लवकर शिजते आणि झटपट तयार होते. लोक वर्षानुवर्षे प्रेशर कूकरचा वापर करतात. पण बऱ्याचदा वारंवार त्याचा वापर करून, झाकण किंवा रबर सैल होते. ज्यामुळे कूकरची शिटी होत नाही.

अशा स्थितीत डाळ आणि तांदुळाचे पाणी बाहेर फेकले जाते. शिवाय अन्न तयार होण्यासही बराच वेळ लागतो. जर प्रेशर कूकरचं झाकण नीट बसत नसेल तर, काही टिप्स फॉलो करा. यामुळे प्रेशर कूकर व्यवस्थितरित्या काम करेल(An easy tip for fixing a leaky gasket in a Pressure Cooker).

प्रेशर कूकरचं रबर सैल का होते?

- प्रेशर कूकरचे रबर सैल होण्याचे एकमेव कारण म्हणजे ते जुने झाले आहे. रबर योग्य प्रकारे धुतले नसल्यास तरीही सैल होते.

- प्रत्येक वापरानंतर प्रेशर कूकर तसेच त्याचे रबर काढून धुवावे.

साउथमध्ये घरोघरी जसं दही खातात, ‘तसं’ खा, बॅड कोलेस्टेरॉल विसरा आणि वजनही होईल कमी

- प्रेशर कूकरचे रबर नेहमी साबण आणि पाण्याने धुवा, परंतु लोखंडी स्क्रबर वापरू नका. त्यामुळे रबर खराब होण्याची शक्यता जास्त असते.

- धुतल्यानंतर, प्रेशर कूकरचे रबर पूर्णपणे कोरडे होऊ द्या, कूकरच्या झाकणात लावू नका.

प्रेशर कूकरचे झाकण सैल झाल्यास काय करावे?

कूकरचे रबर थंड करा

प्रेशर कूकरचे रबर सैल झाले असेल तर, त्याला थंड करा. यासाठी रबर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यामुळे प्रेशर कूकरचं रबर घट्ट होईल, आणि कूकरमध्ये सहज दाब निर्माण होईल. रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता आपण थंड पाण्याने देखील रबर धुवू शकता.

टेप

कधी-कधी कूकरचा रबर खूप सैल होतो आणि नवीन घ्यायला बाजारात जायला वेळच मिळत नाही. अशावेळी मध्यभागी रबर कापून अतिरिक्त भाग काढून टाका. नंतर सुई आणि धाग्याच्या साहाय्याने ते जोडा आणि वर टेप लावा. या ट्रिकमुळे सैल झालेले रबर घट्ट होईल.

पीठ लावा

धुळीने माखलेला फॅन साफ करण्याची युनिक ट्रिक, १० मिनिटात पंखा दिसेल नव्यासारखा - चकाचक

प्रेशर कूकरच्या झाकणाचं रबर सैल झालं असेल तर, कणकेच्या गोळ्याचा वापर करा. यासाठी कणकेचा गोळा घेऊन झाकणाभोवती लावा. नंतर कूकरचे झाकण ठेवा. पण यातही प्रेशर वाढेपर्यंत कूकरचे झाकण धरून ठेवावे लागेल. हा उपाय तात्पुरता आहे. याने झाकण व्यवस्थित बसेल आणि मग कूकरमध्ये योग्य दाब तयार होईल.

अनेकदा स्त्रिया कूकर न धुता स्वयंपाक करतात. यामुळे भाजीचे कण कूकरच्या रबराला चिकटतात. त्यामुळे रबर खराब होण्याची समस्या निर्माण होते. हे टाळण्यासाठी प्रत्येक वापरानंतर कूकर आणि त्याचे रबर धुणे आवश्यक आहे.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स