Lokmat Sakhi >Social Viral > Anand Mahindra on Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीच्या आधी महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओनं मन जिंकलं, नेटिझन्स म्हणाले...

Anand Mahindra on Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीच्या आधी महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओनं मन जिंकलं, नेटिझन्स म्हणाले...

Anand Mahindra on Ganesh Chaturthi : या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीवर कोरिव काम करताना दिसत आहे. या मुलाच्या हाताच्या जादूनं आनंद महिंद्रा प्रभावित झाले आणि कॅप्शनमध्येही महिंद्राने मुलाचे खूप कौतुक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:33 AM2022-08-30T11:33:53+5:302022-08-30T11:44:14+5:30

Anand Mahindra on Ganesh Chaturthi : या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीवर कोरिव काम करताना दिसत आहे. या मुलाच्या हाताच्या जादूनं आनंद महिंद्रा प्रभावित झाले आणि कॅप्शनमध्येही महिंद्राने मुलाचे खूप कौतुक केले.

Anand mahindra on ganesh chaturthi twitter video of boy sculpting lord ganesha goes viral | Anand Mahindra on Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीच्या आधी महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओनं मन जिंकलं, नेटिझन्स म्हणाले...

Anand Mahindra on Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीच्या आधी महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओनं मन जिंकलं, नेटिझन्स म्हणाले...

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर अनेकांना आपले फॅन बनवले आहे. त्यांनी शेअर केलेला मजकूर अनेकांना आवडतो. यावेळीही महिंद्रांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून गणेश भक्तांना खूप आनंद झाला. तसे, आनंद महिंद्रा नेहमीच प्रतिभावान लोकांचे कौतुक आणि मदत करताना दिसतात. पण या मुलाचे टॅलेंट पाहून तुम्हीही त्या मुलाला सलाम कराल. (Anand mahindra on ganesh chaturthi twitter video of boy sculpting lord ganesha goes viral)

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीवर कोरिव काम करताना दिसत आहे. या मुलाच्या हाताच्या जादूनं आनंद महिंद्रा प्रभावित झाले आणि कॅप्शनमध्येही महिंद्राने मुलाचे खूप कौतुक केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

व्हिडिओसोबत आनंद महिंद्रा म्हणाले की, त्याचे हात एखाद्या महान शिल्पकारासारखे फिरतात. मला प्रश्न पडतो की अशा मुलांना त्यांच्या पात्रतेचे प्रशिक्षण मिळावे की त्यांनी त्यांची कला सोडून द्यावी ? महिंद्राने उपस्थित केलेल्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापासून लोक स्वतःला रोखू शकले नाहीत.

फक्त २ मिनिटांत नारळ फोडण्याची सोपी ट्रिक; नारळ फोडण्याचं अवघड काम होईल एकदम सोपं

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकेच नाही तर हजारो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) व्हिडिओला लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. काहींना आश्चर्य वाटले तर काहींना अभिमान वाटला. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Web Title: Anand mahindra on ganesh chaturthi twitter video of boy sculpting lord ganesha goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.