आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ते कधी तरुणांना प्रेरणा देतात तर कधी एखाद्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करत तिच्याविषयी आपले मत व्यक्त करतात. काहीवेळा ते उद्यमशील तरुणांना प्रोत्साहन देत त्यांना आर्थिक मदतही करतात. नुकताच त्यांनी एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ही पोस्ट अतिशय साधी असून त्यामध्ये त्यांनी कपडे वाळवण्याच्या पारंपरिक तंत्रज्ञानाविषयी सांगितले आहे. महिंद्रा अॅंड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी यासंबंधिचे एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे (photo of latest Technology to Dry Clothes Netizen’s Reactions On Tweeter).
यामध्ये दोन महिला पारंपरिक पद्धतीने दोरीवर कपडे वाळवताना दिसत आहेत. या पोस्टला कॅप्शन देताना महिंद्रा म्हणतात, काहीवेळा लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे मागे किंवा आपल्या पारंपरिक, बेसिक गोष्टीपर्यंत जाणे. सौर आणि पवन उर्जेचा वापर करून यात कपडे सुकवले जातात असे या चित्रात लिहीले असून दोन महिला या कपड्यांकडे पाहत असल्याचे दिसते. महिंद्रा यांच्या या काहीशा गमतीशीर पण अर्थपूर्ण पोस्टला २ दिवसांत ११ हजारहून अधिक लाईक्स आले आहेत. आनंद महिंद्रा यांच्या फॉलोअर्सची संख्या खूप जास्त असून त्यांच्या प्रत्येक पोस्टला नेटीझन्सकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.
Sometimes, the ‘latest’ technology is just about going back to the basics… pic.twitter.com/q8HceJDcC4
— anand mahindra (@anandmahindra) July 15, 2022
“कमीत कमी गरजांमध्ये आयुष्य जगणे आणि नैसर्गिक कृत्रिम तंत्रज्ञानापेक्षा नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे जास्त आवश्यक आहे” असे काही युजर्सनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. तंत्रज्ञानाने आपल्याला पारंपरिक गोष्टी विसरायला भाग पाडले असे एकाने आपल्या प्रतिक्रियेत लिहीले आहे. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी जुन्या गोष्टींचा ऱ्हास होत नाही हा निसर्ग नियम आहे असेही एकाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. तर काही लोकांनी महिंद्रा यांच्या या पोस्टवर रिप्लाय देताना राजकीय किंवा काही इनोव्हेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. अनेकांनी महिंद्रा कायम अपडेट असतात आणि सतत काही ना काही पोस्ट करुन आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल आभारही मानले आहेत.