गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशी पार पडली. यंदा आपण सगळेच गणेशोत्सवात अतिशय उत्साहाने सहभागी झालो होतो. आनंद महिंद्रा गणपती बाप्पाचा एक व्हिडिओ शेअर करत गणेश भक्तांना खूश केले आहे. अतिशय जड अंत:करणाने आपण सगळे बाप्पाचे विसर्जन करतो आणि त्याला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करतो. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्य़ा व्हिडिओमध्येही याविषयीच भाष्य करण्यात आले आहे (Anand Mahindra Social media post Viral).
महिंद्रांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून गणेश भक्तांना खूप आनंद झाला. या व्हिडिओमध्ये हत्तीचे एक छोटे पिल्लू दिसत आहे. हे पिल्लू अतिशय जोरजोरात आपली इवलीशी सोंड हलवताना दिसत आहे. यामागे बाप्पा आपल्याला सोंडेने अलविदा करत असल्याचा भाव असल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे. आपल्या या पोस्टला कॅप्शन देताना महिंद्रा म्हणतात, बाप्पा आपल्या सोंडेने गुडबाय करतोय, आणि आपण त्याला म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! सी यू नेक्स्ट इयर. या व्हिडिओमध्ये पिल्लू हत्तीच्या समोर एक मोठा हत्ती उभा असल्याचे दिसते. याबरोबरच या हत्तींच्या बाजूला बगळे आणि छान हिरवेगार गवत असल्याचेही दिसते.
अवघा ५ सेकंदांचा हा व्हिडिओ काही तासांत करोडो लोकांनी पाहिला आहे. जवळपास २८ हजार जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या व्हिडिओचे कौतुक केले तर काहींनी आपल्याला हा व्हिडिओ आवडला नसल्याचे सांगितले आहे. याआधीही गणपती उत्सवाच्या आधी महिंद्रा यांनी एक ट्विट केले होते. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीवर कोरीव काम करताना दिसत आहे. या मुलाच्या हाताच्या जादूनं आनंद महिंद्रा प्रभावित झाले आणि कॅप्शनमध्येही महिंद्राने मुलाचे खूप कौतुक केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओचे नेटीझन्सनीही बरेच कौतुक केले होते. बरेच लोक महिंद्रा यांना आपले आदर्श मानतात आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. आनंद महिंद्रा कधी आपल्या पोस्टमधून एखादा विनोद करतात तर कधी कोणाच्या कामाचे, प्रतिभेचे कौतुक करताना दिसतात.