Lokmat Sakhi >Social Viral > Anand Mahindra : शाब्बास पोरी! डोंगरावर अभ्यास करणाऱ्या शाळकरी मुलीला पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....

Anand Mahindra : शाब्बास पोरी! डोंगरावर अभ्यास करणाऱ्या शाळकरी मुलीला पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....

Anand Mahindra Reaction on Studying Girl : हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही मेहनत करण्याची प्रेरणा मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:28 PM2022-06-28T12:28:16+5:302022-06-28T12:36:53+5:30

Anand Mahindra Reaction on Studying Girl : हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही मेहनत करण्याची प्रेरणा मिळेल.

Anand mahindra told a girl his motivation while studying on a rock | Anand Mahindra : शाब्बास पोरी! डोंगरावर अभ्यास करणाऱ्या शाळकरी मुलीला पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....

Anand Mahindra : शाब्बास पोरी! डोंगरावर अभ्यास करणाऱ्या शाळकरी मुलीला पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand mahindra) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून तो रोज नवीन माहिती आपल्या चाहत्यांना देत असतात. अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर एका मुलीचा अभ्यास करतानाचा फोटो शेअर केला आहे. ही मुलगी एका डोंगराळ रस्त्यावर बसून एकटीच अभ्यास करत असल्याचे चित्रात दिसत आहे. (Viral Photo of girl studying on a rock)

हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही मेहनत करण्याची प्रेरणा मिळेल. हा फोटो शेअर केल्यानंतर आनंद महिंद्रा यांनीही एक माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले आहे - खूप सुंदर फोटो. 'ही माझी सोमवारची प्रेरणा आहे.' (Anand mahindra told a girl his motivation while studying on a rock)

हा फोटो अभिषेक नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोसोबत अभिषेकने लिहिले की, - आज मी हिमाचलच्या स्टॉन (Staun) भागात सहलीवर होतो. या चिमुरडीला एकटं बसून लिहिताना पाहून मला नवल वाटले. तिची अभ्यासाबाबत असलेली एकाग्रता पाहून मला किती आश्चर्य वाटले ते सांगता येणार नाही. (This little girl studying alone in wilderness is Anand Mahindra’s motivation)

धक्कादायक! पोटात दुखतंय म्हणून टॉयलेटमध्ये गेली विद्यार्थीनी; आणि दिला बाळाला जन्म

हे ट्विट आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केले, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोवर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिले की- खरंच ही मुलगी आमच्यासाठी प्रेरणास्थानापेक्षा कमी नाही. त्याचवेळी, आणखी एका यूजरने लिहिले आहे - खूप सुंदर फोटो. मुलगी खूप पुढे जाईल.

Web Title: Anand mahindra told a girl his motivation while studying on a rock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.