लॅटीन अमेरिकी संस्कृतीमध्ये (Latin American cultures) एका मुलीचा १५ वा वाढदिवस अविस्मरमीय ठरत आहे. इथल्या बर्थ डे पार्टीला क्विनसेनेरा (quinceanera) म्हटलं जात. खूप धुमधडाक्यात इथे वाढदिवस साजरा केला जातो. उद्योगपती आनंद महिंद्रांनी (Anand mahindra) शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी ट्रॅक्टर चालवताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिनं ट्रॅक्टरवरच पार्टी हॉलमध्ये एंट्री घेतली आहे.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांनी या पोस्टसह दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीची इच्छा होती की तिचा १५ वा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करावा. तिने ट्विटरवर लिहिले की, तिचा 15 वा वाढदिवस "ब्राझिलियन संस्कृतीतील एक मोठा मैलाचा दगड" आहे. मला ट्रॅक्टर आवडतात महिंद्रा ब्रँड आवडतो! असं कॅप्शन दिलं. म्हणून आमच्या वितरकाने तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी एक छोटा ट्रॅक्टर दिला."
या व्हिडीओमध्ये एक मुलगी ट्रॅक्टरवर बसून पार्टीत प्रवेश करत आहे. स्नीकर्ससह गुलाबी पोशाख परिधान करून, ती तिच्या पाहुण्यांना आनंद देण्यासाठी ट्रॅक्टरचे हेडलाइट्स फ्लॅश करते. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्यापासून हा व्हिडिओ २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, ज्यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत. १६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. ज्यावर त्यांचे 8.5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ते अनेकदा त्यावर मनोरंजक पोस्ट शेअर करतात. अलिकडेच त्यांच्या नावाचं एक फेक अकाऊंट क्रिएट केलेलं दिसून आलं. यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही आनंद महिद्रांनी जाहिर केलं.