Lokmat Sakhi >Social Viral > अनंत अंबानी आणि राधिकाच्या ‘मामेरू’ साेहळ्याची सगळीकडेच चर्चा! हा पारंपरिक सोहळा नेमका काय असतो?

अनंत अंबानी आणि राधिकाच्या ‘मामेरू’ साेहळ्याची सगळीकडेच चर्चा! हा पारंपरिक सोहळा नेमका काय असतो?

Anant Ambani- Radhika Marchant's Mameru Ceremony: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानिमित्त नुकत्याच झालेल्या मामेरू सोहळ्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. बघा हा सोहळा नेमका असतो कसा...(what is mameru program in gujarathi tradition)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2024 05:04 PM2024-07-04T17:04:09+5:302024-07-04T17:04:47+5:30

Anant Ambani- Radhika Marchant's Mameru Ceremony: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानिमित्त नुकत्याच झालेल्या मामेरू सोहळ्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. बघा हा सोहळा नेमका असतो कसा...(what is mameru program in gujarathi tradition)

Anant ambani radhika marchant's mameru ceremony, what is mameru program in gujarathi tradition, what is the importance of mameru ceremony | अनंत अंबानी आणि राधिकाच्या ‘मामेरू’ साेहळ्याची सगळीकडेच चर्चा! हा पारंपरिक सोहळा नेमका काय असतो?

अनंत अंबानी आणि राधिकाच्या ‘मामेरू’ साेहळ्याची सगळीकडेच चर्चा! हा पारंपरिक सोहळा नेमका काय असतो?

Highlightsयाच कार्यक्रमाला काही ठिकाणी मोसालू असेही म्हटले जाते. गुजराथमध्ये लग्नसोहळ्यातला हा एक अतिशय महत्त्वाचा सोहळा असून याच सोहळ्यापासून विवाहाच्या विधींना सुरुवात होते.

आपल्याला माहितीच आहे की उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव म्हणजेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा १२ जुलै रोजी हाेत आहे. आता कोणतंही लग्न म्हटलं की त्याच्या काही दिवस आधीपासून वेगवेगळ्या धार्मिक विधींना, कार्यक्रमांना सुरुवात होत असतेच. तशीच सुरुवात अनंत आणि राधिका यांच्या लग्नाच्या निमित्तानेही झाली आहे (Anant Ambani- Radhika Marchant's Mameru Ceremony). त्यापैकी पहिला मामेरू हा कार्यक्रम नुकताच अत्यंत थाटात पार पडला. या सोहळ्यात राधिका अतिशय देखणी दिसत होती. तिने या सोहळ्यासाठी तिच्या आईचे पारंपरिक दागिने घातले होते, असं म्हणतात. पण ज्या सोहळ्याची एवढी चर्चा व्हायरल झाली आहे, तो मामेरू सोहळा म्हणजे नेमकं काय असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. तेच आता पाहूया...(what is the importance of mameru ceremony)

 

अंबानी कुटूंब मुळचे गुजरातचे. त्यामुळे गुजराथी प्रथेनुसार लग्नाच्या काही दिवस आधी नवरीचे मामा आणि आईच्या माहेरचे इतर कुटूंबिय तिच्यासाठी अनेक भेटवस्तू आणतात. या सगळ्या भेटवस्तू तिला प्रेम, शुभेच्छा आणि आशिर्वाद म्हणून दिल्या जातात. नवरीसोबतच नवरदेवालाही अनेक भेटवस्तू दिल्या जातात.

गॅसही न पेटवता २ मिनिटांत करा कडीपत्त्याचा चटकदार ठेचा, बघा झटपट होणारी सोपी रेसिपी

याच सोहळ्याला मामेरू असे म्हणतात. याच कार्यक्रमाला काही ठिकाणी मोसालू असेही म्हटले जाते. गुजराथमध्ये लग्नसोहळ्यातला हा एक अतिशय महत्त्वाचा सोहळा असून याच सोहळ्यापासून विवाहाच्या विधींना सुरुवात होते. या सोहळ्यासाठी अनंत- राधिकासह इतर सगळेच अंबानी कुटूंबिय केशरी, गुलाबी अशा थीमच्या कपड्यांमध्ये दिसून आले. 

 

असं म्हणतात की मामेरू सोहळ्यात मामा नवरी मुलीला वेगवेगळ्या भेटवस्तू तर देताच.

गुलाबाच्या रोपावर बुरशी पडली, पानांवर बारीक छिद्रं दिसू लागली? ५ उपाय करा, गुलाब पुन्हा बहरेल 

पण त्यामध्ये मिठाई, पांढऱ्या किंवा मोतिया रंगाची पानेतर साडी आणि पांढऱ्या किंवा मोतिया रंगाच्या बांगड्या या गोष्टी अगदी आवर्जून दिल्या जातात. राधिकाच्या या सोहळ्याला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या संपूर्ण सोहळ्यात अस्सल गुजराथी वेशभुषेत राधिकाचे सौंदर्य खुलून आले होते. 
 

Web Title: Anant ambani radhika marchant's mameru ceremony, what is mameru program in gujarathi tradition, what is the importance of mameru ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.