इंटरनेटमुळे आपल्याला दररोज असे अनेक व्हिडिओ पहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर आपण आपले हसू रोखू शकत नाही. नुकताच कॅनडामध्ये राहणाऱ्या एका अँकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. बातमी देताना तिनं माशी गिळली आणि त्याचा व्हिडिओ (Social Media Treanding Video) ही शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यांचे हसू रोखू शकत नाहीत. (Anchor swallowed a fly during anchoring video went viral on social media)
व्हायरल व्हिडिओमध्ये अँकरिंग करताना अँकरने चुकून माशी कशी गिळली हे दिसत आहे. तिने माशी गिळताच ती थोडा वेळ थांबली, पण तिचे रिपोर्टिंग चालूच ठेवले. फराह नासर असे या अँकरचे नाव आहे. ती कॅनडाच्या ग्लोबल न्यूज चॅनलमध्ये अँकर आहे. हा व्हिडिओ तिने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबतच तिने कॅप्शनही लिहिले आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे- मी व्हिडिओ शेअर करत आहे जेणेकरून मला हसता येईल. हसणे खूप महत्वाचे आहे. अँकरिंग करताना मी एक माशी गिळली.
दिवसभराचा थकवा असताना रात्री लवकर झोप येत नाही? 5 उपाय, पडल्या पडल्या ढाराढूर झोपाल
या व्हिडिओला 99 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर या व्हिडिओला 16शेहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना म्हटले - तुम्ही कामाच्या दरम्यान इतके आनंदी होता की तुमच्या तोंडात माशी आली हे तुम्हाला कळलेही नाही. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले आहे - मी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहे.