Lokmat Sakhi >Social Viral > अंकिता लोखंडेने आईला राखी बांधली तर काय बिघडलं? लोकांनी का केलं तिला ट्रोल?

अंकिता लोखंडेने आईला राखी बांधली तर काय बिघडलं? लोकांनी का केलं तिला ट्रोल?

Raksha Bandhan Celebration By Ankita Lokhande: अभिनेत्री अंकिता लोखंडे राखी पौर्णिमा सेलिब्रेशनमुळे सध्या चांगलीच ट्रोल (troll) होत आहे. बघा असं नेमकं केलंय तरी काय तिने.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 02:00 PM2023-08-31T14:00:35+5:302023-08-31T14:01:39+5:30

Raksha Bandhan Celebration By Ankita Lokhande: अभिनेत्री अंकिता लोखंडे राखी पौर्णिमा सेलिब्रेशनमुळे सध्या चांगलीच ट्रोल (troll) होत आहे. बघा असं नेमकं केलंय तरी काय तिने.....

Ankita Lokhande Trolls: Ankita tied rakhi to her mother and massi, netizens get angry | अंकिता लोखंडेने आईला राखी बांधली तर काय बिघडलं? लोकांनी का केलं तिला ट्रोल?

अंकिता लोखंडेने आईला राखी बांधली तर काय बिघडलं? लोकांनी का केलं तिला ट्रोल?

Highlightsअंकिताने आई किंवा मावशीला राखी बांधली यावर नेटिझन्सला विशेष काही आक्षेप नाही. त्यामुळे तिच्या ट्रोल होण्याचं कारण वेगळंच आहे. 

राखी पौर्णिमेचा सण घराघरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. बॉलीवूडचे सेलिब्रिटी तसेच मराठी अभिनेते- अभिनेत्री यांनीही राखी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. सेलिब्रिटींचे राखीपौर्णिमा सेलिब्रेशन त्यांच्या चाहत्यांनीही सोशल मिडियाद्वारे उत्साहाने पाहिले. पण या सगळ्यांमध्ये मात्र अंकिता लोखंडे जबरदस्त टोल होत आहे. बघा तिच्या ट्रॉल (Ankita Lokhande Trolls) होण्यामागचं नेमकं कारण काय आणि कशासाठी तिच्यावर टीका होत आहे...(Raksha Bandhan Celebration By Ankita Lokhande)

 

अंकिताने तिचा एक व्हिडिओ नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या आईला औक्षण करून राखी बांधताना दिसत आहे. आईच्या शेजारी अंकिताची मावशीही बसलेली आहे.

शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी फक्त रोज चालणे पुरेसे नाही, करा ३ व्यायाम, वाचा भाग्यश्रीचा सल्ला

अंकिताने आईसोबतच मावशीलाही औक्षण केलं आणि नंतर दोघींच्याही हातावर राखी बांधली. "I promise to protect you mommy till my last breath, I love you so much, I love you massi...",  असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. अंकिताने आई किंवा मावशीला राखी बांधली यावर नेटिझन्सला विशेष काही आक्षेप नाही. त्यामुळे तिच्या ट्रोल होण्याचं कारण वेगळंच आहे.

 

अंकिताच्या या व्हिडिओला ज्या काही कमेंट आल्या आहेत, त्यातील बहुतांश कमेंट अशा आशयाच्या आहेत की वडीलांचं निधन होऊन अजून महिनाही झाला नाही आणि अंकिताने सेलिब्रेशन सुरू केलं.... अंकिता सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे रिल्स टाकत असते.

बाजरीची भाकरी करतोच आता करा बाजरीचा खरपूस पराठा, मुलांनाही आवडेल आणि पौष्टिकही

आता पुन्हा एकदा तिची रिल्स टाकायला सुरुवात झाली आहे... असंही तिला कुणी म्हटलं आहे. अंकिताच्या वडिलांचं नुकतंच काही दिवसांपुर्वी निधन झालं. तरीही ती साडी नेसून नटून- थटून सण साजरा करतेय, शिवाय सोशल मिडियावरही व्हिडिओ शेअर करतेय, यावर अनेकांना आक्षेप आहे आणि तेच तिच्या ट्रोल होण्यामागचं कारण आहे. 

 

Web Title: Ankita Lokhande Trolls: Ankita tied rakhi to her mother and massi, netizens get angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.