Join us  

हाय रे तेरा घागरा! ए लाइन घागरा, सुंदर एम्ब्रॉयडरी आणि 45 दिवस.. नवरी नटली अंकिता लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 5:40 PM

Actress Ankita Lokhande- Vicky Jain: अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाला आता अवघे काही दिवस राहिले असून सध्या अंकिताचा मेहंदीचा लूक (mehendi function) जबरदस्त व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सिद्धार्थ बन्सल (Sidhdharth Bansal) यांनी डिझाईन केलेला हा घागरा तयार करण्यासाठी तब्बल ४५ दिवस लागले, अशा चर्चेला आता उधाण आले आहे. 

ठळक मुद्दे १५ आर्टिस्ट लोकांनी ४५ दिवस काम करून हा घागरा घडविला आहे.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif and Vicky Kaushal's marriage) यांचा बी टाऊनचा दिमाखदार लग्नसोहळा नुकताच पार पडला... आता तयारी सुरू झाली आहे ती मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा बॉयफ्रेंड विकी जैन यांच्या लग्नाची....अंकिताने नुकतीच विकी जैन याच्या नावाची मेहंदी लावली असून तिच्या मेहंदी आणि संगीत कार्यक्रमातले फोटो तिने इन्स्टाग्रामला (instagram) शेअर  केले आहेत.  पायघोळ लेहेंगा, ब्लाऊज आणि ओढणी हा लूक अंकिताला खूपच शोभून दिसत असून तिचा घागरा खरोखरंच होणाऱ्या नवरीचे सौंदर्य वाढविणारा ठरला आहे. आता लग्न समारंभातले कोणतेही विधी म्हटलं की पांढरा, मोतिया असे रंग घेणं जरा टाळल्या जातं. त्या ऐवजी ग्लॉसी, डार्क रंगांना प्राधान्य दिलं जातं. पण या रंगाला इतर अनेक रंगांसोबत मॅच केलं तर त्याने कसला सॉलिड लूक मिळू शकतो, हे अंकिता लोखंडेच्या व्हायरल (social viral) झालेल्या घागऱ्याच्या फोटोंवरून दिसून येत आहे...

 

अशी आहे अंकिताच्या घागऱ्याची नजाकत amazing ghagra of Actress Ankita Lokhandeआधीच सांगितल्याप्रमाणे अंकिताचा हा घागरा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सिद्धार्थ बन्सल यांनी डिझाईन केला असून त्याचा बेस रंग पुर्णपणे पांढरा आहे. या घागऱ्याबाबत अशीही चर्चा आहे की १५ आर्टिस्ट लोकांनी ४५ दिवस काम करून हा घागरा घडविला आहे. तसंच घागऱ्यावर करण्यात आलेलं जास्तीतजास्त काम हे हॅण्ड एम्ब्रॉयडरी प्रकारातलं आहे. पांढऱ्या घागऱ्यावर गोल्डन थ्रेड अधिकाधिक वापरून एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुलाबी, निळा, पिवळा आणि हिरवा या रंगांचे रेशीम धागेही घागऱ्यावर एम्ब्रॉयडरीसाठी वापरले आहेत. ए लाईन प्रकारातला हा घागरा असून अंकिताच्या अंगावर तो अधिकाधिक हेवी दिसत आहे. घागऱ्यावर मुख्यत: रेशीम धाग्यांनी पॅचवर्क केलेलं आहे. तसंच सिक्विन आर्टवर्क देखील या घागऱ्यावर दिसून येतं. घागऱ्याच्या बॉटमला अतिशय हेवी वर्क करण्यात आलं असून त्याने घागऱ्याला खूपच हेवी, रिच लूक मिळाला आहे. 

 

घागऱ्यावर जशी एम्ब्रॉयडरी आणि पॅचवर्क आहे, तसंच काम ब्लाऊजवरही करण्यात आलं आहे. समोरच्या बाजूने ब्लाऊज व्हि शेप असून त्यामुळे अंकिताच्या ट्रॅडिशनल लूकला थोडा बोल्डनेसचाही टच झाला आहे. घागऱ्याच्या सौंदर्याला चार चाँद लावले आहेत ते गुलाबी रंगाच्या ओढणीने. ओरगान्झा फॅब्रिकची ही ओढणी असून तिच्या काठांना सोनेरी धाग्याने थ्रेडवर्क करण्यात आले आहे, तर ओढणीच्या मध्ये मध्ये बुटी एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. अंकिताचे कानातले झुमके आणि बिंदीही घागऱ्याच्या रंगाशी मिळती- जुळती असून न्यूड शेड मेकअप आणि लिपस्टिकमध्ये ती परफेक्ट दिसत आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअंकिता लोखंडेफॅशनसोशल मीडिया