तुळशीच्या लग्नापाठोपाठ बॉलीवूडमध्येही जणू काही वेडिंग सिझन सुरू झाला आहे.... गोड चेहऱ्याची आणि तेवढीच गोड हसणारी मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडेही आता बाेहल्यावर चढणार आहे. या खुशीत तिने तिच्या मैत्रिणींना नुकतीच मोठ्या दणक्यात बॅचलरेट पार्टी दिली आहे. आता अंकिताची पार्टी म्हटल्यावर ती जबरा असणारच, यात काही वाद नाही. ही पार्टी तिने तिच्या काही खास मैत्रिणींसाठीच ठेवली होती. मोजून ८ ते १० मैत्रिणी या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
डान्स, गाणी, मजा, मस्ती आणि खूप सारे सेल्फी.. असं या पार्टीचं स्वरूप होतं... यामध्ये म्हणे अंकिताने चक्क 'मै ससुराल नही जाऊंगी...' या गाण्यावर झकासपैकी डान्स केला. एवढंच नाही तर या पार्टीत म्हणे अंकिताची जवळची मैत्रीण अभिनेत्री रश्मी देसाई हिने चक्क अंकिताला पाठीवर घेतले आणि सगळ्या पार्टी हॉलमधून फिरवूनही आणले... आता यावरूनच कल्पना येते की सगळ्या मैत्रिणींनी ही बॅचलरेट केवढी एन्जॉय केली आहे... या पार्टीत अंकिता खूपच स्टनिंग ब्यूटी दिसत होती. पार्टीसाठी तिने खास बैंगणी रंगाचा मिनी फ्रॉक घातला होता. केस मोकळे सोडून त्यांना बेल्ट लावला होता. अशा लूकमध्ये अंकिता खरोखरंच खूप छान दिसत होती. लग्न जवळ आल्यामुळे अंकिताचा चेहराही चांगलाच खुलला होता...
आज- काल फक्त सेलिब्रिटी लोकंच बॅचलर्स पार्टी करतात असं काही नाही. हे वाण आता जवळपास सगळ्याच लहान- मोठ्या शहरांमध्ये पसरलं आहे. त्यामुळे लग्नसराईच्या आधी बॅचलरेट पार्ट्यांचंही जवळपास सर्वच ठिकाणी चांगलंच जंगी आयोजन केलं जातं. तुम्हीही बॅचलरेट पार्टीत जाण्याची तयारी करत असाल किंवा तुमची स्वत:चीच बॅचलरेट पार्टी असेल तर त्यासाठी तुमचा लूक कसा असावा आणि कसा नसावा, हे सांगणाऱ्या या काही टिप्स नक्कीच फॉलो करा..
बॅचलरेट पार्टीसाठी मेकअप करताना ......
- लग्नानंतर मुलीचा लूक चेंज होत असतो. त्यामुळे बॅचलरेट पार्टी हा एक असा शेवटचा इव्हेंट असतो, ज्यामध्ये ती अगदी बिनधास्तपणे फ्लर्टी लूक कॅरी करू शकते. लग्नानंतर अशी संधी नाही, त्यामुळे हा दिवस फुल टू एन्जॉय करा..
- या पार्टीसाठी वेस्टर्न ड्रेसिंग करण्याचा ट्रेण्ड आतापर्यंत होता. पण आता इंडोवेस्टर्न लूक अशा पार्ट्यांमध्ये जास्त चालत आहे.
- त्यामुळे वन पीस, लेगिन्स ॲण्ड ट्रेन्डी टॉप... स्कर्ट असे प्रकार यामध्ये सध्या इन आहेत.
- बॅचलर्स पार्टी घराच्या बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये करणार असाल, तर शक्य तेवढा सोबर लूक असू द्या. कारण सुरक्षेच्या दृष्टीने ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.
- कुणाच्या घरात आणि सुरक्षित स्थळी बॅचलर्स करणार असाल तर फुल टू ऑन होऊन बिनधास्त धमाल करा.
- बॅचलर्स पार्टी रात्री असते. त्यामुळे एरवी सहजासहजी करता न येणारा ग्लॉसी मेकअप तुम्ही या पार्टीत करू शकता.
- पार्टीसाठी ड्रेसकोड ठरविणे अधिक चांगले. होणाऱ्या नवरीचा ड्रेस कलर वेगळा आणि बाकीच्यांसाठी ड्रेस कोड आणि कलर वेगळा असं केलं तर जिची पार्टी आहे, तिला एक वेगळा आणि स्पेशल असण्याचा फिल मिळू शकतो.