Join us

अय्या, ड्रेस रंग बदलतोय! लाईट पडताच ड्रेसचा कलर चेंज, पाहा फॅशन का जलवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 12:28 IST

Anrealage’s collection changes colours under UV light at Paris Fashion Week लाईट पडली अन् कपड्यांचा रंगच बदलला, असली कसली ही फॅशन, तुम्हीच पाहा..

''सारा जमाना हसीनो का दिवाना'', बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित हे गाणं आपण ऐकलंच असेल. हे गाणं त्यांच्या पोशाखावरून प्रचंड गाजलं. या गाण्यात त्यांच्या पोशाखावर लाईटींग लावलेली असते. अमिताभ थिरकताना ती लाईट देखील चमकते. सध्या एका फॅशन शो मधील मॉडेलचा पोशाक व्हायरल होत आहे. ज्यात कपड्यावर यु-व्ही लाईट पडल्याने कपड्याचा रंगच बदलतो.

काही दिवसांपूर्वी सुपरमॉडेल बेला हदीदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये डिझायनरने रॅम्पवर उभी असलेल्या बेलासाठी लेटेक्सचा पोशाख तयार केला. असाच काहीसा प्रकार एनरिलैज(Anrealage) च्या फॅशन शोमध्ये पाहायला मिळाला. जिथे मॉडेल्स साध्या कपड्यात मंचावर आल्या तर खऱ्या, पण काही मिनिटांतच त्यांच्या कपड्याचा रंग बदलायला लागतो(Anrealage’s collection changes colours under UV light at Paris Fashion week).

खरं तर, या फॅशन शोमध्ये यू-व्ही लाईटचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे काही क्षणात मॉडेल्सच्या कपड्यांचा रंग बदलत होता. रंगच नाही तर, कपड्यावरील नमुने देखील बदलत होते. कधी कपड्यावर गोलाकार किंवा चेकर्ड नमुना दिसत होता. तर कधी पोल्का डॉट्स आणि मोनोक्रोम आउटफिट दिसत होता.

शाहरुखची लेक सुहाना करते मिनिमल मेकअप, फॅशनेबल नाही तर कंफर्टेबल कपड्यांचा तिचा खास चॉईस

या व्हायरल व्हिडिओमध्ये, स्टेजवर एक मॉडेल पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उभी असलेली दिसत आहे. तिने मिडी ड्रेस, फुल स्लिव्ह्ज, छान नेकलाइनचा ड्रेस परिधान केला आहे. यूव्ही लाईटच्या संपर्कात आल्यानंतर ड्रेसवर हिरव्या रेषा तयार झाल्या आणि हातांच्या खालच्या भागाचा रंग नारंगी झाला.

ऑटम-विंटर पॅरिस फॅशन वीक, 2023-2024 मध्ये या नव्या पोशाकांचे सादरीकरण करण्यात आले. हे पोशाक जपानचे टॉप फॅशन अवार्ड विनर, एनरिलैजचे डिझाइनर कुहिनिको मोरिनागा यांनी डिझाइन केले. त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून हा यूव्ही लाइट फॅशन शो केला. फेंडीच्या सहकार्याने या शोमध्ये कलेक्शन सादर करण्यात आले.

मॉडेल्स एकापाठोपाठ स्टेजवर येत असून, त्यांच्या कपड्यांवर पडलेल्या लाईटमुळे त्यांचा संपूर्ण लूक बदलतो. सध्या या शोचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. 

टॅग्स :फॅशनसोशल व्हायरलसोशल मीडियापॅरिस