Lokmat Sakhi >Social Viral > म्हणे ‘अकाय’ म्हणजे काय? २०२४मध्ये लोकांनी सर्वाधिक गुगल केलं विराट-अनुष्काच्या लेकाचं नाव कारण...

म्हणे ‘अकाय’ म्हणजे काय? २०२४मध्ये लोकांनी सर्वाधिक गुगल केलं विराट-अनुष्काच्या लेकाचं नाव कारण...

Anushka Sharma & Virat Kohli's son Akaay ranks second in Google's Year in Search 2024 for 'Meaning' Category : Anushka-Virat's son Akaay makes it to Google's Year in Search 2024 list : Anushka Sharma and Virat Kohli's Son Akaay Rules Google's Year In Search 2024 List : २०२४ च्या गुगल सर्च लिस्टमध्ये टॉपवर आहे 'अकाय, विराट-अनुष्काच्या मुलासाठी लोकांनी का गुगल पालथं घातलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2024 14:23 IST2024-12-12T14:10:45+5:302024-12-12T14:23:48+5:30

Anushka Sharma & Virat Kohli's son Akaay ranks second in Google's Year in Search 2024 for 'Meaning' Category : Anushka-Virat's son Akaay makes it to Google's Year in Search 2024 list : Anushka Sharma and Virat Kohli's Son Akaay Rules Google's Year In Search 2024 List : २०२४ च्या गुगल सर्च लिस्टमध्ये टॉपवर आहे 'अकाय, विराट-अनुष्काच्या मुलासाठी लोकांनी का गुगल पालथं घातलं?

Anushka Sharma and Virat Kohli's Son Akaay Rules Google's Year In Search 2024 List Anushka-Virat's son Akaay makes it to Google's Year in Search 2024 list | म्हणे ‘अकाय’ म्हणजे काय? २०२४मध्ये लोकांनी सर्वाधिक गुगल केलं विराट-अनुष्काच्या लेकाचं नाव कारण...

म्हणे ‘अकाय’ म्हणजे काय? २०२४मध्ये लोकांनी सर्वाधिक गुगल केलं विराट-अनुष्काच्या लेकाचं नाव कारण...

'नावात काय आहे', हे शेक्सपिअरचे जगप्रसिद्ध वाक्य आपण सगळेच ऐकून आहोत. आपल्या जन्मानंतर आपल्याला काहीतरी विशेष असे नाव दिले जाते, तेच नाव लावत आपण संपूर्ण आयुष्य संपेपर्यंत जगत असतो. जीवन मरणाच्या मधील या आयुष्य नावाच्या जीवनप्रवासात नाव हे महत्वाचं असतंच. शेक्सपिअर यांनी कितीही वेळा म्हटलं 'नावात काय आहे', तरीही नाव हे प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्वाचं असत. आपले नाव म्हणजे आपली एक प्रकारे ओळखच असते(Anushka Sharma & Virat Kohli's son Akaay ranks second in Google's Year in Search 2024 for 'Meaning' Category).

सध्या नेटकरी आणि सोशल मिडीयावर फक्त एकाच नावाची चर्चा (Anushka-Virat's son Akaay makes it to Google's Year in Search 2024 list) होताना दिसत आहे. २०२४ च्या फ्रेब्रुवारीमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या दुस-या मुलाच स्वागत करत त्याच नाव त्यांनी 'अकाय' (Akaay) ठेवलं. यानंतर हे नाव इतके फेमस झाले की लोकांनी गुगलवर जाऊन त्याच्या 'अकाय' या नावाचा अर्थ शोधला. भारताचा लाडका क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा दुसरा मुलगा 'अकाय' याने गुगलच्या सर्च २०२४ या वर्षाच्या यादीत स्थान मिळवले आहे. गुगलने सादर केलेल्या रिपोर्टनुसार, 'अकाय' नावाचा अर्थ या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या शब्दांमध्ये आहे(Anushka Sharma and Virat Kohli's Son Akaay Rules Google's Year In Search 2024 List).

विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव गुगल सर्च यादीत झळकले कारणं... 

गुगलवर २०२४ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप १० शब्दांच्या अर्थांची यादी समोर आली आहे. कोणत्या शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी लोकांना उत्सुकता असल्याचे या यादीतून दिसून आले आहे. आता या यादीत अकायचेही नाव आहे. म्हणजेच वर्षभर लोकांनी अकाय नावाचा अर्थ काय याचा शोध घेतला आहे. तसेच, जेव्हा अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलाच्या जन्माची घोषणा केली होती, तेव्हा त्यांनी पोस्टमध्ये त्याचे नाव देखील सांगितले होते. हे नाव याआधी क्वचितच कोणी ऐकले असेल, त्यामुळे अकायचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता होती. 

 'अकाय' नावाचा खरा अर्थ आहे... 

लोकांच्या उत्सुकतेमुळे २०२४ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप १० शब्दांच्या अर्थांच्या यादीत 'अकाय' च्या नावाचा समावेश झाला आहे. अकाय हा तुर्की मूळचा हिंदी शब्द आहे. संस्कृतमध्ये, अकाय म्हणजे “काया नसलेली कोणतीही गोष्ट स्वरूप किंवा शरीर. हा शब्द ‘काया’ या शब्दापासून आला असून त्याचा अर्थ शरीर असा होतो. या शब्दाचा अर्थ शोधल्यामुळे ‘अकाय’ हा शब्द आता अधिकच प्रसिद्ध झाला आहे, आणि चाहते या नावाची चर्चा करत आहे.

हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या विकत आणल्या, पण लवकर सडतात? ५ उपाय - भाज्या खा मनसोक्त...


जान्हवी कपूर हिवाळ्यात आवडीने खाते रताळ्याचा ' हा ' खास पदार्थ, वजन होते कमी - पचनही सुधारते...

'अकाय' नावाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी केलं सर्च... 

अनुष्का आणि विख्यात क्रिकेटर विराट कोहली हे दोघे दुसऱ्यांदा पालक बनले. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी अनुष्काने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला, त्याचं नाव 'अकाय' ठेवण्यात आलं. काही सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत विराट अनुष्काने मुलाच्या जन्माची घोषणा करत त्याचं नाव सर्वांनाच सांगितलं. ज्या क्षणी विराट अनुष्काच्या मुलाच्या नावाची घोषणा झाली सोशलमिडिया त्याच्या नावाने गाजू लागलं. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या नावाचा अर्थ सर्च करण्यास सुरूवात केली. अकायचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. अनुष्का – विराटचा मुलगा अकायच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका शोधला गेला की त्याने २०२४ या वर्षासाठी गुगलच्या सर्चमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. अकायचा अर्थ काय हा सर्च गुगलवर दुसऱ्या स्थानी आहे.

विराट कोहली आणि अनुष्काने आपल्या मुलाच नाव 'अकाय' ठेवल. त्यांच्या मुलीच नावही असंच वेगळ आहे. वामिका अस तिच नाव असून त्याचा अर्थ दुर्गा देवी असा होतो. दोन्ही मुलांची अर्थपूर्ण नाव ठेवलेल्या विराट-अनुष्काने त्यांना सोशल मिडिया आणि पापाराझींपासून मात्र दूर ठेवलं आहे. त्यांनी कधीच त्या दोघांचा चेहरा मिडिया किंवा जगासमोर आणलेला नाही.

Web Title: Anushka Sharma and Virat Kohli's Son Akaay Rules Google's Year In Search 2024 List Anushka-Virat's son Akaay makes it to Google's Year in Search 2024 list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.