Join us  

‘अराकू’ नावाच्या कॉफीत ‘खास’ काय आहे ? जी २० साठी आलेल्या पाहूण्यांना अराकू कॉफी का भेट देण्यात आली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2023 3:45 PM

Anand Mahindra is ‘very proud’ on Araku Coffee being gifted to G20 Leaders : आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ज्या कॉफीचे काैतुक केले त्या कॉफीत खास काय आहे ?

भारताच्या जी २० यशाचे भरपूर कौतुक होते आहेच. देशोदेशीचे लोक आहे. त्यांना भरड धान्यापासून कॉफीपर्यंत अस्सल भारतीय चवीचे पदा‌र्थ खिलवण्यात आले. विविध भारतीय भेटवस्तूही देण्यात आल्या. त्यातच एक होती ‘अराकू’ नावाची कॉफी. ही काॅफी भेट देण्यात आली त्याचा आनंद उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही ट्विट करत शेअर केला. असं या कॉफीत खास काय आहे?(Anand Mahindra on Araku coffee being gifted to G20 leaders: 'Very, very proud').

आंध्र प्रदेशातील अराकू व्हॅलीमध्ये सेंद्रिय पद्धतीने लागवड करुन या कॉफीचे पीक घेतले जाते. अराकू कॉफी ही जगातील पहिली टेरोयर - मॅप केलेली कॉफी आहे.  अराकू कॉफी (Anand Mahindra cheers for Araku coffee’s global recognition at G20 Summit) हा जगातील सर्वोत्तम कॉफीचा प्रकार, तो ही भारतात पिकविला जातो याचा मला अभिमान आहे असं महिंद्रा यांनी नमूद केलं आहे(Araku Coffee: Gifted to G20 Leaders, praised by Anand Mahindra).

केरळच्या महिलांचा अनोखा डान्स विक्रम, पाहा नृत्याचा व्हायरल व्हिडिओ, डोळ्याचे पारणे फिटते...

दिया मिर्झाच्या रिसायकल मिडी ड्रेसची चर्चा, जुन्या कपड्यांतले धागे वापरुन कसा बनवला नवा ड्रेस...

अराकू कॉफी (Araku Coffee) ही आंध्र प्रदेशच्या चिंतापल्ली विभागातील गोंडीपाकालू, लम्मासिंघी, कप्पालु, पेडावलासा आणि एराचेरुवुलु या भागात प्रामुख्याने पिकविली जाते. एकूण २१ हजार १०४ एकर क्षेत्रात ही कॉफी पिकवली जाते. अराकू कॉफीचे उत्पादन आंध्र प्रदेशातील १,३०० हून अधिक आदिवासी शेतकरी करतात. या ही जागा कॉफी उत्पादनासाठी अतिशय योग्य मानली जाते. अराकू व्हॅलीचे हवामान कॉफी उत्पादनासाठी अतिशय खास आहे. येथे दिवसा गरम तापमान असते, तर रात्री खूप थंड वातावरण असते. याशिवाय येथील माती लोहाने समृद्ध आहे. यामुळे येथे उत्पादित होणारे उत्पादन अतिशय मंद गतीने पिकते आणि त्याचा विशेष सुगंध कायम राहतो.

या अराकू कॉफीचे बी हलके व मध्यम आकाराचे असते. हलकासा आंबटपणा आणि सौम्य गोडपणा, थोडासा द्राक्षासारखा आंबटपणा अशी आंबट गोड चव लागते. अराकू व्हॅलीच्या कॉफीमध्ये कधी मधासारखा गोडवा असतो तर कधी वाइनची हलकी चव लागते तर कधी चेरीसारख्या फळांची चव लागते. अराकू कॉफीविषयी अर्थातच अनेकांना ही माहिती नव्हती. महिंद्रा यानी ट्विट केले, विदेशी पाहूण्यांना ही कॉफी भेट देण्यात आली म्हणून तिची सध्या खास चर्चा आहे.

टॅग्स :सोशल व्हायरल