Lokmat Sakhi >Social Viral > एअर फ्रायर की डीप फ्रायर? आरोग्यासाठी खरेच आणावा का घरी एअर फ्रायर, तज्ज्ञांनी सांगतात काय योग्य..

एअर फ्रायर की डीप फ्रायर? आरोग्यासाठी खरेच आणावा का घरी एअर फ्रायर, तज्ज्ञांनी सांगतात काय योग्य..

Air fryer health benefits: Deep fryer vs. air fryer nutrition: How air fryers reduce fat intake: Low-calorie cooking with air fryers: Best air fryer recipes for weight loss: Are air fryers healthier than deep fryers?: Air fryer vs deep fryer for weight management: Pros and cons of air fryers for health: बाजारात सध्या एअर फ्रायरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 13:14 IST2025-03-05T13:12:46+5:302025-03-05T13:14:04+5:30

Air fryer health benefits: Deep fryer vs. air fryer nutrition: How air fryers reduce fat intake: Low-calorie cooking with air fryers: Best air fryer recipes for weight loss: Are air fryers healthier than deep fryers?: Air fryer vs deep fryer for weight management: Pros and cons of air fryers for health: बाजारात सध्या एअर फ्रायरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Are air fryers healthier than deep fryers which one is best for health doctor said know the exactly reason | एअर फ्रायर की डीप फ्रायर? आरोग्यासाठी खरेच आणावा का घरी एअर फ्रायर, तज्ज्ञांनी सांगतात काय योग्य..

एअर फ्रायर की डीप फ्रायर? आरोग्यासाठी खरेच आणावा का घरी एअर फ्रायर, तज्ज्ञांनी सांगतात काय योग्य..

बदलत्या जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. ९० टक्के लोक जंक फूडचे सेवन करतात तर त्यातील काही लोक डाएटवर लक्ष देतात. (Air fryer health benefits) सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आहारात काय असायला हवे? आहार कसा असायला हवा? कोणते पदार्थ खायला हवे? याविषयीचा सर्व प्लान ठरलेला असतो. (How air fryers reduce fat intake)


सध्याच्या काळात अन्न बनवण्याची पद्धतीही बदलली आहे. कमी वेळेत पण सोप्या पद्धतीने जेवण बनवणं हे गृहिणींसाठी मोठं आव्हानात्मक बनले आहे. (Are air fryers healthier than deep fryers) भारतातील बहुतेक घरांमध्ये तळलेले पदार्थ खातात. लहान मुले फ्रायईज सारखे तळलेले पदार्थ अतिशय आवडीने खातात. सणवार असला तर या दिवशी पुरी, भाजीसह अनेक तळणीच्या पदार्थांची चव चाखायला मिळते. (Air fryer vs deep fryer for weight management) पदार्थ अगदी डीप फ्राय करुन त्याची चव वाढवली जाते. परंतु, यामध्ये कॅलरीजे प्रमाण जास्त असते. बाजारात सध्या एअर फ्रायरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, आरोग्यासाठी एअर फ्रायर की, डीप फ्रायर फायदेशीर काय आहे? जाणून घेऊया आहारतज्ज्ञ प्रियंका सेहरावत यांच्याकडून. (Pros and cons of air fryers for health)

स्वयंपाक करताना भाजीत इन्स्टंट नूडल्स मसाला घालता? आहारातज्ज्ञ सांगतात, वाढतो हायपरटेन्शनचा धोका वाढतोय कारण..

एअर फ्रायर आणि डीप फ्रायरमधला फरक

जेवण बनवताना आपण पदार्थ डीप फ्राय करत असू तर यामध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढते. ज्यावेळी आपण जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खातो तेव्हा कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. एअर फ्रायर हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असून यामध्ये अन्नपदार्थ पुरेशा प्रमाणात शिजवले जाते आणि त्यानंतर शॅलो फ्राय केले जाते. अन्न व्यवस्थित शिजल्यामुळे आणि कमी तेलात असल्यामुळे कॅलरीज वाढण्याचा धोका कमी प्रमाणात असतो. आरोग्यासाठी डीप फ्रायपेक्षा हा पर्याय चांगला असू शकतो. 

">

डॉक्टरांचे मत काय?

डीप फ्रायरपेक्षा एअर फ्रायर हे अधिक सोपे आणि लवकर काम करणारे आहे. एअर फ्रायरमध्ये पदार्थ तळण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे कॅलरीज आणि अतिरिक्त चरबीची समस्या कमी होते. एअर फ्रायरमध्ये बनवलेले अन्न डीप फ्रायमध्ये तयार केलेल्या अन्नइतके चविष्ट नसते. पण आरोग्यासाठी एअर फ्रायर फायदेशीर ठरु शकते. परंतु, एअर फ्रायरचा अतिप्रमाणात वापर केल्याने डिहायड्रेशनची समस्या देखील होऊ शकते. तसेच या दोघांपैकी, आहारात सॅलड आणि उकडलेल्या भाज्यांचा समावेश करावा. लोकांना याची चव आवडत नसली तरी हा आरोग्यदायी पर्याय आहे. यामुळे भाज्यांमध्ये असलेले पोषक घटक नष्ट होत नाही. यामुळे रक्तदाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. 

Web Title: Are air fryers healthier than deep fryers which one is best for health doctor said know the exactly reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.