Lokmat Sakhi >Social Viral > मच्छर चावतात म्हणून घरात सतत मॉस्किटो किलर प्रॉडक्टस वापरता, ३ गंभीर दुष्परिणाम...

मच्छर चावतात म्हणून घरात सतत मॉस्किटो किलर प्रॉडक्टस वापरता, ३ गंभीर दुष्परिणाम...

Are Mosquito Killer Products Plug-In Safe To Use Everyday : डास मारण्याच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक केमिकल्स व विषारी द्रव्य असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 12:50 PM2023-04-08T12:50:59+5:302023-04-08T13:17:11+5:30

Are Mosquito Killer Products Plug-In Safe To Use Everyday : डास मारण्याच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक केमिकल्स व विषारी द्रव्य असतात.

Are Mosquito Coils Or Plug In Repellents Safe To Use Daily | मच्छर चावतात म्हणून घरात सतत मॉस्किटो किलर प्रॉडक्टस वापरता, ३ गंभीर दुष्परिणाम...

मच्छर चावतात म्हणून घरात सतत मॉस्किटो किलर प्रॉडक्टस वापरता, ३ गंभीर दुष्परिणाम...

आपल्यापैकी बरेचजणांच्या घरांमध्ये मच्छर चावू नये म्हणून नानाविविध उपाय केले जातात. मॉस्किटो किलर लिक्विड किंवा मच्छर मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या, मॉस्किटो कॉइल घरात सतत लावलेलेच असतात. आजकाल बाजारांत मच्छरांना मारण्यासाठी विविध प्रकारचे स्प्रे, कॉइल, लिक्विड सहज विकत मिळतात. बहुतेक लोकांच्या घरात मॉस्किटो किलर लिक्विड कॉइल व मशीन सकाळपासून रात्रीपर्यंत सुरूच असते. तर काहीजण रात्री मच्छर चावू नये म्हणून अखंड रात्रभर हे मशीन सुरु ठेवून झोपतात. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हे मच्छर मारण्यासाठीचे विविध प्रॉडक्टस रात्री किंवा संपूर्ण वेळ चालू ठेवणे योग्य आहे का?

खरंतर सतत चावणाऱ्या डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण या विषारी, केमिकल्सयुक्त प्रॉडक्टसचा वापर करतो. परंतु मॉस्किटो किलर लिक्विडमध्ये बाष्पयुक्त रसायने असतात जे डासांना मारण्याचे काम करतात. तसेच एन-डायथिल-मेटा-टोल्युअमाइड सारखी रसायने असतात जी डास आणि किटकांना मारण्यासाठी वापरली जातात. त्याचबरोबर डास मारण्याच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक केमिकल्स व विषारी द्रव्य असतात. एकूणच, मॉस्किटो किलर लिक्विड ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आरोग्याची हानी होते(Are Mosquito Coils Or Plug In Repellents Safe To Use Daily). 

मॉस्किटो किलर लिक्विड सतत वापरण्याचे दुष्परिणाम :- 

१. मॉस्किटो किलर लिक्विडच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांमध्ये जळजळ किंवा ऍलर्जी होऊन डोळ्यांसंबंधित अनेक आजार निर्माण होऊ शकतात. 

२. मच्छर मारण्यासाठीच्या या प्रॉडक्ट्समध्ये असंख्य प्रकारच्या केमिकल्सचा वापर केलेला असतो. हे केमिलक्स श्वासावाटे आपल्या शरीरात जाऊन आपल्याला गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. 

३. एवढेच नाही तर डोकेदुखी, डोळ्यांमध्ये ऍलर्जी, चिडचिड, चक्कर येणे, मळमळ आणि उलट्या होणे अशा समस्याही होऊ शकतात.

 उन्हाळ्यात डास खूप चावतात, रात्रीची झोप उडाली? घरच्याघरी करा १ सोपा उपाय, पळवा डास...

मॉस्किटो किलर लिक्विडचा किती काळासाठी वापर करावा ? 

मॉस्किटो किलर लिक्विडचा किती काळासाठी वापर करावा हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. मॉस्किटो किलर लिक्विड हे झोपायच्या आधी २ ते ३ तासांसाठी  वापरणे योग्य आहे. झोपायच्या २ ते ३ तास आधी आपल्या झोपायच्या खोलीत हे लावून ठेवावे. परंतु झोपताना खोलीत मॉस्किटो किलर लिक्विड चालू करुन झोपू नये. मॉस्किटो किलर लिक्विड वापरण्याची देखील एक पद्धत आहे, या पद्धतीने त्याचा वापर केल्यास आपल्याला फारसे दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत.  मॉस्किटो किलर लिक्विडचा वापर करायचाच असल्यास, झोपण्याच्या २ ते ३ तास आधी खोलीत ते चालू करुन ठेवावे. यामुळे डास मारतील. त्यानंतर आपण खोलीत झोपायला आल्यावर ते बंद करूनच झोपावे. रात्रंदिवस ते चालू ठेवणे टाळा. तसेच, झोपण्याचा वेळेत हे वापरणे संपूर्णपणे बंद करा. 

या लोकांनी मॉस्किटो किलर लिक्विडपासून दूर रहावे... 

जर आपल्याला दमा, न्यूमोनिया किंवा फुफ्फुसाचा त्रास असेल तर आपण मॉस्किटो किलर लिक्विडपासून दूर रहावे. मॉस्किटो किलर लिक्विड खोलीत लावल्यानंतर आपण खोलीत असताना खोलीचे दार लावू नये. सहसा मॉस्किटो किलर लिक्विड लावल्यानंतर खोलीचे दार उघडे ठेवा, जेणेकरुन हवा खेळती राहील. याशिवाय तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांना मॉस्किटो किलर लिक्विडपासून दूर ठेवावे. अन्यथा, मॉस्किटो किलर लिक्विडमध्ये असणाऱ्या विषारी केमिकल्समुळे लहान मुलांना आरोग्यासंबंधीच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.   

मॉस्किटो किलर लिक्विडपेक्षा इतर पर्यायांचा वापर करावा :- 

१. इको फ्रेंडली मॉस्किटो किलर लॅम्प (Eco - Friendly Mosquito Killers Lamp) :-  इको फ्रेंडली मॉस्किटो किलर लॅम्प हे डास, माश्या आणि इतर किटकांना मारण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याचा वापर करून आपण सर्व प्रकारचे डास, किटक सहज नष्ट करू शकता. ही मच्छर मारणारी यंत्रे डासांना आकर्षित करणारा प्रकाश निर्माण करतात आणि ते डासांना विजेचा झटका देऊन किंवा जाळ्यात अडकवून मारतात. हा इको फ्रेंडली मॉस्किटो किलर लॅम्प १ तासात शेकडो डासांचा नाश करू शकतो. त्याचा वापर केल्याने आपले आरोग्य आणि पर्यावरण या दोघांनाही कोणतीही हानी होणार नाही.

 

२. इलेक्ट्रिक मॉस्किटो किलर रॅकेट (Electric Mosquito Killers Racket) :- जर आपल्यालाही घरातील डासांचा त्रास होत असेल तर हे इलेक्ट्रिक मॉस्किटो किलर रॅकेट आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या इलेक्ट्रिक मॉस्किटो किलर रॅकेटमध्ये डासांना मारण्यासाठी इलेक्ट्रिक तारांचा एक सापळा बसवलेला असतो. ज्यामुळे हानिकारक डास आणि इतर किटकही नष्ट होऊ शकतात.

Web Title: Are Mosquito Coils Or Plug In Repellents Safe To Use Daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.