नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. काही लोकं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरातली साफ सफाई करतात. पार्टी, कार्यक्रमाचे आयोजन करतात. दरम्यान, साफसफाई करत असताना घरातील प्लास्टीकचे डबे देखील साफ करणे तितकेच महत्त्वाचे आहे. काही प्लास्टीकच्या डब्ब्यातील पिवळटपणा निघत नाही. त्यातील हट्टी डाग डब्ब्यांना कळकट बनवतात. यासह कालांतराने त्यातून दुर्गंधी देखील येऊ लागते. डब्ब्यांना स्वच्छ आणि नवी चमक द्यायची असेल तर, काही घरगुती उपायांचा वापर करून पाहा. याने डब्ब्यांना पुन्हा नवी चमक मिळेल.
कॉस्टिक सोडाचा करा वापर
प्लास्टिकचे कंटेनर स्वच्छ आणि गंधमुक्त करण्यासाठी आपण कॉस्टिक सोडा वापरू शकता. यासाठी 1 बादली गरम पाण्यात 3 चमचे कॉस्टिक सोडा मिसळा. आता सर्व प्लास्टिकचे डबे त्यात भिजत ठेवा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने धुवा याने कंटेनर स्वच्छ आणि गंधमुक्त होतील.
लिंबूचा रस करेल मदत
प्लास्टिकचे कंटेनर स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस उपयुक्त ठरेल. यासाठी 1 बादली गरम पाण्यात लिंबाचा रस आणि पांढरा व्हिनेगर मिसळा. आता या मिश्रणात प्लास्टिकचे डबे भिजवा आणि 10 मिनिटांनंतर सर्व कंटेनर बाहेर काढून वाळवा. याने कंटेनर नव्या सारखे चमकेल.
लिक्विड क्लोरीन ब्लीच ठरेल फायदेशीर
क्लोरीनच्या मदतीने, आपण प्लास्टिक कंटेनर सहजपणे साफ करू शकता. यासाठी प्लॅस्टिकचा डबा लिक्विड क्लोरीन ब्लीच सोल्युशनमध्ये भिजवा. काही वेळाने डबे बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे डब्यातील सर्व डाग सहज निघून जातील आणि डब्याला दुर्गंधही येणार नाही.
डिटर्जंटने प्लास्टिकचे कंटेनर करा स्वच्छ
प्लास्टिक कंटेनर स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंटचा वापर फायदेशीर ठरेल. यासाठी गरम पाण्यात डिटर्जंट मिसळा. आता या पाण्यात प्लास्टिकचे डबे भिजत ठेवा. यानंतर काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा.