आपण कितीही घर सावरण्याचा प्रयत्न केला तरी घरात कुठल्या तरी कोपऱ्यात धूळ राहते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात घर स्वच्छ ठेवणे सोपी गोष्ट नाही. घर स्वच्छ नसेल तर घरात पाल, मच्छर आणि झुरळांचा वावर हा होतोच. घरात एकदा का पालीने प्रवेश केला तर ती लवकर घर सोडूनही जात नाही.
पालीची अनेकांना भीती वाटते. पाल जर भिंतीवर असली तरी खाली जमिनीवरील माणसांना घाम फुटतो. पाल मानवाला काही करत नाही, मात्र तिचा वावर घरात असला तरी धडकी भरते. पालीपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती उपाय आपल्याला मदत करतील.
कांदा आणि लसणाचा करा असा वापर
घरात पालीने प्रवेश केला असेल तर, घराच्या कोपऱ्यात जिथे पाल असेल तिथे कांदा आणि लसूण ठेवा. याशिवाय जिथून हवा घरात प्रवेश करत असेल तिथे कांदा आणि लसूण ठेवा. जेणेकरून त्याचा वास संपूर्ण घरात पसरेल. याने घरातील पाली निघून जातील.
मिरेपूडचा स्प्रे
काळी मिरी हा एक असा घटक आहे ज्यामुळे पालींना प्रचंड त्रास होतो. यामुळे त्यांना प्रचंड अलर्जी होते. आपण घरी मिरेपूड तयार करून घरात फवारणी करू शकता. घरात काळी मिरी पूड नसेल तर, लाल तिखट पावडरचा देखील वापर करू शकता. काळी मिरी पूड घरातील कोपऱ्यात किंवा भिंतीवर शिंपडा याने घरातील पाली पळून जातील.
नेफ्थलीनच्या बॉलचा करा वापर
नेफ्थलीनच्या बॉलपासून येणारा वास पालींना सहन होत नाही. त्यामुळे घरातील कोपऱ्यात हे बॉल्स ठेवा. याने पाल घरात येणार नाही. यासह इतर किटाणू घरात फिरकणार नाही.
थंड पाणी ठेवेल पालींना लांब
पालींना उबदार ठिकाणी राहायला आवडते. ते अधिक काळ थंड ठिकाणी राहू शकत नाही. जर आपल्याला घरात पाल दिसल्यास त्यांच्यावर थंड पाणी शिंपडा. यासह खोलीच्या एसीचे तापमान कमी करा जेणेकरून खोली थंड होईल आणि पाल निघून जातील.