Join us  

काय डोकं फिरलंय का, समोश्यात गुलाबजामचं सारण? पाहा हा गुलाबजाम समोश्याचा भयंकर व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 1:14 PM

गुलाबजाम समोश्यात सारण म्हणून घालावं असं नक्की का वाटलं असेल?

ठळक मुद्देलोक खाण्यापिण्याच्या बाबतीत काय प्रयोग करतील सांगता येत नाहीसमोसा विथ गुलाबजाम सारण, ऐकावे ते थोडेच

भारतात जाती-धर्मांची विविधता असल्यामुळे खाण्यापिण्याच्या पद्धतींची आणि पदार्थांचीही विविधता पाहायला मिळते. प्रत्येक राज्यातील गावातील पदार्थांची काही ना काही खासियत असते. जीभेचे चोचले पुरवणारे हे पदार्थ चाखावेत तितके थोडेच. हे पदार्थ खाऊन आपण तृप्त होतो खरे पण माणूस हा प्रयोगशील असल्याने तो पारंपरिक पदार्थांमध्येही सतत काही ना काही प्रयोग करत असतो. दिल्लीतील एका ठेलेवाल्याने एक भन्नाट प्रयोग केला आहे. हा प्रयोग पाहून तुम्ही नक्कीच नाक मुरडल्यावाचून राहणार नाही. भारतात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ठेल्यांवर पाणीपुरी, सँडविच, वडापाव, समोसा खाण्याची मजाच काही और आहे. आता रस्त्यावरच्या एखाद्या स्टॉलवर काहीतरी खाणे ठिक आहे. त्यातही गरमागरम समोसा असेल तर आहाहाहाहा...पण हा समोसा पाहून तुमचं नक्कीच डोकं फिरु शकतं.

या पठ्ठ्याने समोसा केला, इथपर्यंत ठिक आहे. आता समोसा म्हटल्यावर त्यात बटाटा, मटार किंवा ओलं नारळ, सुकामेवा अगदी कोबी वगैरे घालणे ठिक आहे. पण या समोसा बनवणाऱ्याने असे काही न करता त्यात सारण म्हणून चक्क गुलाबजाम घातला आहे. आता त्याची कल्पनाशक्ती भन्नाट असली तरी समोसा हा समोसा असतो आणि गुलाबजाम हा त्याच्या जागीच छान लागतो. एका फूड ब्लॉगरने या स्टॉलला भेट देत हा आगळावेगळा गुलाबजाम समोसा ट्राय केला खरा. पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहूनच हा पदार्थ कसा लागतो याची आपल्याला कल्पना आल्यावाचून राहणार नाही. या ब्लॉगरचे नाव अभिषेक असून त्याने त्याचा हा अनुभव आणि व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये समोसा खाल्ल्यानंतर या ब्लॉगरचे तोंड किती वाकडे झाले आहे ते आपण पाहू शकतो. त्यामुळे हा प्रयोग नक्कीच फसला असणार हे वेगळे सांगायला नको. एका आठवड्यात या व्हिडियोला २० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 

सध्या फूड ब्लॉगर आणि युट्यूबर यांना तर जोरदार डिमांड आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण भारतातील एखाद्या लहानशा गावातील ब्लॉगरने केलेला फूड ब्लॉग अगदी सहज वाचू शकतो. शहरातील वेगवेगळे हॉटेल्स, ठेले, त्याठिकाणी मिळणारे पदार्थ, त्यांची खासियत, किंमत असे सगळे तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध होते. अभिषेक या ब्लॉगरने गुलाबजाम समोसाचा व्हिडियो पोस्ट करत तुम्ही कधी गुलाबजाम समोसा ट्राय केला आहे? असे विचारल्यावर नोटीझन्सने त्यावर एकाहून एक भन्नाट रिप्लाय दिले आहेत. आम्हाला असा समोसा कधीच ट्राय करायचा नाही, तुझं तोंड पाहूनच तो कसा लागत असेल याची कल्पना आली.  

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नसोशल मीडियादिल्ली