अॅल्युमिनियम फॉइल व बटर पेपरचा (Butter Paper) वापर बहुतेक घरांमध्ये खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी केला जातो. जेव्हा खाद्यपदार्थ पॅक करण्याचा प्रश्न येतो तेव्हा अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. टिफिन पॅक करणे असो किंवा काही खाद्यपदार्थ साठवणे असो, अनेकजण अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करतात. काही लोक बटर पेपर (Butter Paper) देखील वापरतात. असे मानले जाते की यामध्ये अन्न पॅक केल्याने ते तासंतास ताजे राहते.
बटर पेपरला (Butter Paper) 'रॅपिंग पेपर' किंवा 'सँडविच पेपर' असेही म्हणतात. बटर पेपर (Butter Paper) हा नॉन-स्टिक पृष्ठभागासह सेल्युलोजपासून बनलेला कागद असतो. विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक आणि पॅकेजिंगसाठी हॉटेल आणि मिठाईच्या दुकानांमध्ये देखील याचा वापर केला जातो. कारण बटर पेपर (Butter Paper) पदार्थांमधील ओलावा टिकवून ठेवते. खाद्यपदार्थातून निघणारे अतिरिक्त तेल शोषण्यासाठी देखील आपण बटर पेपरचा वापर करु शकता. याउलट जर आपल्याला खूप मसालेदार, खारट आणि व्हिटॅमिन सी समृद्ध खाद्यपदार्थ पॅक करायचे असतील तर त्यासाठीदेखील बटर पेपरचा वापर केला जातो. बटर पेपर सहसा एकदा वापरल्यानंतर आपण तो फेकून देतो. परंतु हा बटर पेपर आपण एकदा वापरल्यानंतर पुन्हा पुन्हा देखील वापरू शकतो. एकदा वापरलेला बटर पेपर पुन्हा वापरण्यायोग्य करण्यासाठी काही साध्या सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(Are You Throwing Away Your Butter Wrappers? This Video Will Change Your Mind).
एकदा वापरलेला बटर पेपर पुन्हा वापरण्यायोग्य करण्यासाठी काही खास टिप्स...
१. आपण बटर पेपरचा (Butter Paper) वापर चपाती गुंडाळण्यासाठी, किंवा इतर काही पदार्थ टिफिनमधून व्यवस्थित रॅप करून नेण्यासाठी वापरतो.
२. हा बटर पेपर एकदा वापरल्यानंतर शक्यतो आपण तो वापरलेला बटर पेपर फेकून देतो.
३. परंतु हा एकदा वापरलेला बटर पेपर फेकून न देता आपण त्याचा अनेकवेळा वापर करु शकतो.
४. बटर पेपर एकदा वापरल्यानंतर तो नळाच्या पाण्याखाली धरून हलक्या हातांनी चोळून धुवून घ्यावा.
हॉटेलात घालतात तशी ताठ-एकही सुरकुती नसलेली बेडशीट घरच्या बेडवर कशी घालायची ? ५ टिप्स...
५. हा बटर पेपर धुतल्यानंतर तो व्यवस्थित पिळून त्यातील अधिकचे पाणी निथळून घ्यावे.
६. आता हा बटर पेपर २ मिनिटांसाठी मायक्रोव्हेवमध्ये ठेवून हलकेच गरम करून घ्यावा. (मायक्रोव्हेव नसल्यास हा बटर पेपर धुवून आपण २ ते ३ मिनिटे गरम तव्यावर देखील शेकून घेऊ शकता.)
सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...
७. त्यानंतर हा बटर पेपर बाहेर काढून पूर्णपणे सुकला आहे याची खात्री करून मग व्यवस्थित घडी घालूंन एका डब्यांत स्टोअर करून ठेवावा.
८. अशाप्रकारे एकदा वापरलेला बटर पेपर आपण एका सोप्या ट्रिकने स्वच्छ करून पुन्हा पुढच्या वापरासाठी वापरण्यायोग्य करून ठेवू शकता.