देशाची सेवा करणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी एका मोठ्या स्वप्नाप्रमाणे असते. लष्करी अधिकारी बनणं हे त्यापेक्षा मोठं स्वप्न असतं. अलिकडेच एका अधिकाऱ्यानं व्हिडिओ शेअर केला आहे जो तुफान चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये निवृत्त होण्याआधी आईला सेल्यूट करणारा अधिकारी पाहून सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत. (Army officer last salute to his mother just before retirement viral video)
सोशल मीडियावर हा व्हिडिओ रंजन महाजन नावच्या एका युजरनं शेअर केला आहे. त्यांचं प्रोफाईल पाहून असं वाटतंय की ते मोठया पदावर असावेत. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की अंबाला ते दिल्ली चालत आले आणि रिटायर होण्याआधी त्यांनी आपल्या आईला शेवटचा सेल्यूट केला.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की ते त्यांच्या घरी पोहोचतात आणि एक महिला दरवाजा उघडते, त्यानंतर ते थेट त्याच्या आईकडे जातात. त्यांची आई व्हरांड्यात बसलेली असते आणि तिला त्यांना पाहून खूपच आनंद होतो. त्यानंतर ते आईसमोर उभे राहून तिला नमस्कार करतात. सुरुवातीला आई आश्चर्यचकित होते, त्यानंतर ते तिला मिठी मारतात.
ना जीम ना डाएटची गरज; घरीच रोज ५ पदार्थ खा, पटकन वजन घटेल, स्लिम फीट दिसाल
हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. हा खूप भावनिक क्षण होता कारण यानंतर ते लष्कराच्या ड्रेसमध्ये दिसणार नाही. ही सलामी त्यांची अखेरची सलामी होती. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोक आपली मते मांडत आहेत.