Join us  

लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर अर्शद वारसीने लग्न केले रजिस्टर्ड, पण इतक्या उशीरा का?-अर्शद सांगतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 5:06 PM

Arshad Warsi and Maria Goretti register their marriage after almost 25 years! : 'आम्ही एकमेकांना कमिटेड आहोत, एवढंच आमच्यासाठी पुरेसं होतं.'- अर्शद

लग्न हे दोन जीवांचे मिलन मानले जाते. पण लग्न कधी आणि कोणासोबत करावे? याचा सर्वस्व निर्णय हा आपला स्वतःचा असतो. कारण आपल्याला त्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवायचे असते. आता लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेण्ड सुरु आहे. काही लोकं एकमेकांसोबत राहतात, वेळ घालवतात. पण जेव्हा नात्यात विश्वास निर्माण होतो, तेव्हाच कपल्स लग्नासाठी तयार होतात (Social Viral).

अशीच काहीशी आगळी-वेगळी स्टोरी समोर आली. मुन्नाभाईचा सर्किट अर्थात अर्शद वारसी याने पत्नी मारिया गोरेटीसोबत स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत पुन्हा एकदा लग्न केलं असून, अर्शदने लग्नाच्या २५ वर्षांनंतर पुन्हा अशा पद्धतीने लग्न का केलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे (Arshad Warsi). पण त्याने यामागचं कारण नुकतंच स्पष्ट केलं आहे(Arshad Warsi and Maria Goretti register their marriage after almost 25 years!).

लग्नाच्या २५ व्या वर्षात पदार्पण तरीही, रीतसर कुठेच नोंदणी नाही..

अर्शद वारसी आणि मारिया गोरेटी हे दोघे १४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्नबंधनात अडकले. यावर्षी हे जोडपं आपल्या लग्नाचा २५वा वाढदिवस साजरा करणार आहे. वेडिंग अॅनिव्हर्सरीची सिल्वर जुबली सेलिब्रेट करण्यासोबत त्यांनी  रजिस्टर्ड मॅरेज करण्याचाही निर्णय घेतला. कारण, इतकी वर्षे झाल्यानंतरही या दोघांनी आपल्या लग्नाची नोंदणीच केली नव्हती. त्यामुळे २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. शिवाय २३ जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले.

'भाभी मोटी लग रही हो!’ म्हणणाऱ्या ट्रोलरला बुमराहची पत्नी संजना गणेशनने खडसावले, म्हणाली..

हृदयद्रावक! पाळणा समजून आईनेच पोटच्या गोळ्याला ठेवले चालू ओव्हनमध्ये, काही वेळानंतर..

या विषयी ई-टाईम्सला मुलाखत देताना अर्शद म्हणाला, 'इतक्या वर्षात लग्नाची नोंदणी करण्याचा विचार आमच्या मनात आला नाही, आणि ते का कोणास ठाऊक गरजेचंही वाटलं नाही. मात्र, प्रॉपर्टीच्या विषयात किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर लग्नाची नोंदणी असणं गरजेचं असतं, हे आम्हाला समजलं. म्हणूनच कायद्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. अन्यथा एक जोडीदार म्हणून आम्ही एकमेकांना कमिटेड आहोत, एवढंच आमच्यासाठी पुरेसं होतं.'

टॅग्स :अर्शद वारसीसोशल मीडियासोशल व्हायरल