Join us  

कोजागरी पौर्णिमा-औक्षणासाठी कणकेचे दिवे ‘असे’ करा परफेक्ट, सुबक-सुंदर दिव्यांनी करा मुलांचं औक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 1:41 PM

Ashwini Pournima Special: अश्विनी पौर्णिमेसाठी अगदी परफेक्ट आकार असणारे कणकेचे दिवे कसे तयार करायचे याविषयी खास टिप्स (how to make kanakeche dive?).....

ठळक मुद्देअश्विन पौर्णिमा, दीप अमावस्या, दिवाळीतील अभ्यंग स्नान, अशा मंगलप्रसंगी अनेक ठिकाणी कणकेचे दिवे लावून औक्षण केले जाते. शिवाय लग्न, मौंजप्रसंगीही औक्षणासाठी कणकेचे दिवेच असतात. त्यामुळे हे दिवे कसे तयार करायचे हे आपण जाणून घेतलेच पाहिजे.

कोजागरी पौर्णिमा किंवा अश्विनी पौर्णिमा म्हणजे चांदण्या रात्रीचा रसिकतेने आस्वाद घेण्याची संधी. एरवी आपण चंद्राकडे एवढं भरभरून बघत नाही. त्याच्या दुधाळ प्रकाशात बसून आपण क्वचितच कधीतरी वेळ घालवतो. पण कोजागरी पौर्णिमा किंवा अश्विनी पोर्णिमेच्या निमित्ताने (Ashwini pournima special) मात्र चंद्राच्या शीतल छायेत बसण्याची संधी मिळते. याच दिवशी तिन्हीसांजेच्या वेळी घरातल्या ज्येष्ठ अपत्याला औक्षण करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी कणकेचे दिवे तयार करून हे औक्षण केले जाते. पण हल्ली बऱ्याच जणींना कणकेचे दिवे करता येत नाहीत (how to make kanakeche dive?). म्हणूनच या काही साध्या सोप्या टिप्स पाहा आणि कणकेचे सुंदर दिवे तयार करा... 

 

कणकेचे दिवे कसे करावे?

कणकेचे दिवे तयार करण्यासाठी आपल्याला अर्थातच थोडी कणिक लागते. त्या कणकेमध्ये थोडी हळद घाला. तुम्ही हळदीचे प्रमाण जेवढे ठेवाल त्यानुसार तुमच्या दिव्यांना छान पिवळा धमक रंग येतो. 

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी करा चटपटीत ओट्स भेळ! सगळेच आवडीने फस्त करतील- घ्या रेसिपी 

दिवे तयार करण्यासाठी तुम्ही जी कणिक भिजवाल ती घट्ट असावी. सैलसर कणिक अजिबात भिजवू नये. त्यामुळे दिव्यांना व्यवस्थित आकार देता येत नाही. कणिक भिजवल्यानंतर तिला थोडा तेलाचा हात लावावा.

 

दिव्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी सुरुवातीला एक छोटासा कणकेचा गोळा हातात घ्या. त्याला व्यवस्थित गोल आकार द्या. मधोमध बोट घालून छिद्र करा. ते छिद्र वाढवत न्या आणि एका बाजूने तो थोडासा दाबून घेऊन निमुळता करा. जेणेकरून तिथे तुम्हाला वात ठेवून ती पेटवता येईल. 

कोजागरी पौर्णिमेला दुधासोबत काहीतरी चटपटीत पदार्थ करायचे म्हणता? घ्या ५ टिप्स, दुधाचा आनंद वाढेल

जर परफेक्ट गोल आकाराचा दिवा हाताने जमत नसेल तर देवघरात ज्या छोट्या वाट्या असतात त्यातली एक वाटी घ्या. तिच्या  खालच्या भागाला थोडे तेल लावा. नंतर त्यावर कणकेचा एक जाड थर दाबून लावा. त्यानंतर वाटी अलगद वरच्यावर काढून घ्या. छान खोलगट आकार तयार होईल. आता या आकाराचा वरचा जो कडा आहे त्याचे एक टोक दोन बोटात धरून किंचितसे दाबा जेणेकरून त्याला छान दिव्याचा आकार येईल. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकोजागिरीकिचन टिप्स