ईशान्य भारतात मेघालय-आसाम या दोन राज्यांना पुराचा प्रचंड तडाखा बसला आहे. सिल्चर-गुवाहाटी ही मोठी शहरं पाण्याखाली आहेत. लोक कंबरेइतक्या पाण्यातून वाट काढत आहेत. कुणी आपल्या शेळ्या बकऱ्या कोंबड्या वाचाव्या म्हणून जीव धोक्यात घालून त्यांना वाचवत आहेत. लेकरंबाळं घेऊन निवारा शोधत आहेत. (Assam Flood 2022)
सिल्चर गुवाहाटी रस्त्यावर तर कंबरेइतक्या चिखलातून माणसं चालत निघाल्याचे कितीतरी व्हिडिओ व्हायरल आहेत. गेल्या काही दिवसांत अपघातांमध्ये तीन मुलांसह ९ जणांचा मृत्यू झाला. मात्र सिल्चरमध्ये महापूरात अडकलेल्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. (Viral Video)
सिल्चरमधील पुराचा व्हिडिओ फेसबुकवर सिल्चर नाऊ या पेजवर शताब्दी दास यांनी केलेला हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कंबरेइतक्या पाण्यातून वाट काढत टोपलीत बाळ ठेवून ते बाळ एकजण सुरक्षित ठिकाणी घेऊन जातंय. त्या लेकराच्या वाट्याला जन्मत: हे पुराचं संकट आलं. पण माणुसकी आहे आणि त्याला सांभाळणारे हातही. चारजण प्रयत्नपूर्वक त्या बाळाला सुरक्षित ठिकाणी नेत आहेत.
नादच खुळा! सुपरबाईक घेऊन रस्त्यावर उतरल्या आजी; व्हायरल होतोय 'कूल आजीं'चा फोटो
मदतीचा हात देत असलेल्यांचे देव भले करो अशी कमेंट एका युजरनं केली आहे. 'सिलचरमधील पुराच्या वेळी हा व्हिडीओ पाहून बासुदेव आपल्या नवजात कृष्णाला डोक्यावर घेऊन जमुना नदी पार करतानाचे दृश्य आठवले असं कुणाला वाटलं. जेवढी माणसं तेवढ्या भावना. संकट मोठं असलं तरी माणुसकी जिवंत असल्याची उमेद हा व्हिडिओ देतोय.